Women participating in a webinar organized by Tanishka Vyasapeeth Dainik Gomantak
गोवा

Gudi Padwa 2023: ‘गुढीपाडवा’ वर्षारंभच नव्हे; ऊर्जेच्या उपासनेचाही दिवस !

सुनील तांबे यांचे प्रतिपादन : सण साजरा करण्याबाबत वेबिनारच्या माध्यमातून ‘तनिष्कां’ना मार्गदर्शन

दैनिक गोमन्तक डिजिटल

‘गुढीपाडवा हा फक्त नववर्षारंभ दिन नसून ऊर्जेची उपासना करण्याचा दिवस आहे. गुढी उभारून आपण आपल्यातील ऊर्जा समाजात पसरवत असतो. नव्या वर्षाचा नवा दिवस अशी सकारात्मक ऊर्जा सर्वत्र पसरवण्याचा सण म्हणजे गुढीपाडवा’ असेही संतुलन आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक सुनील तांबे यांनी सांगितले.

गुढीपाडवा म्हणजे हिंदू दिनदर्शिकेतील पहिला दिवस. पण गुढीपाडवा का,कसा साजरा करावा? गुढी का उभारायची? या समस्त महिलावर्गाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळावीत, त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे, या उद्देशाने ‘तनिष्का’ व्यासपीठद्वारे वेबिनारचे आयोजन केले होते. त्यावेळी सुनील तांबे आणि डॉ. मालविका तांबे यांनी तनिष्कांना मार्गदर्शन केले. या वेबिनारमध्ये राज्यभरातून 300 हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.

आपण मोठ्या उत्साहाने सण-उत्सव साजरा करत असतो, पण तो सण साजरा करण्यामागची शास्त्रशुद्ध पद्धत माहीत नसते. या वेबिनारद्वारे तनिष्कांना गुढीपाडवा साजरा करण्याचे महत्व आणि शास्त्रशुद्ध पद्धत तसेच महत्त्वही सांगण्यात आले.

सण - उत्सव का साजरे करायचे? कशा पद्धतीने साजरे करायचे? यावर सविस्तर माहिती मिळावी ही तनिष्कांची बऱ्याच दिवसांपासून मागणी होती. सकाळ आणि गोमन्तक चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या पुढाकाराने तनिष्कांची ही मागणी पूर्ण झाली.

सुनील तांबे यांनी गुढी कशी उभारावी? हा सण कुटुंबासोबत कसा साजरा करावा, याबद्दल माहिती दिली. चैत्रातील ऋतुबदल आणि त्यानुसार आहार कसा असावा याबद्दल मालविका तांबे यांनी माहिती दिली. महाराष्ट्र,गोव्यातील मिळून बाराशेहून अधिक तनिष्का वेबिनारमध्ये सहभागी झाल्या. याचे संयोजन वर्षा कुलकर्णी व मनस्विनी प्रभूणे नायक यांनी केले.

आमच्या घरी गेली अनेक वर्ष गुढी पाडवा मोठ्या उत्साहात साजरा करतो. पण गुढी का उभारायची? हे माहीत नव्हते. आमच्या आधीची पिढी गुढीपाडवा साजरा करायची म्हणून आम्हीही साजरा करतो. पण तनिष्का व्यासपीठच्या वेबिनारमुळे आम्हाला गुढी पाडव्याचे महत्व तर समजलेच, पण तो कसा साजरा करायचा हेही समजले.

-प्रतीक्षा चणेकर (लाडफे - लाटंबार्से)

सगळे गुढीपाडवा साजरा करतात म्हणून आपणही साजरा करायचा असेच आमच्याकडून होत होते. मनात पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे काही मिळत नव्हती. तनिष्का व्यासपीठने आमचे म्हणणे ऐकले आणि आमच्या मनातील शंकांचे समाधान होईल, अशा पद्धतीने या वेबिनारचे आयोजन केले. सुनील आणि मालविका तांबे यांनी तनिष्कांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांना मुद्देसूद अशी उत्तरे दिली. असा उपक्रम वारंवार घडून आला पाहिजे.

-नयनी शेटगावकर (मोरजी)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT