Goa Shigmotsav 2023 : शिगमोत्सवाला सरकारकडून राजाश्रय : सुदिन ढवळीकर

मांद्रेत चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्याने फेडले डोळ्‍यांचे पारणे
Goa News | Sudin Dhavalikar
Goa News | Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

शिगमोत्सव संस्कृतीला राजाश्रय मिळत असल्याने दिवसेंदिवस त्‍याची प्रगती होत चालली आहे. आपली ही संस्‍कृती टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले. मांद्रेत शिगमोत्सव चित्ररथ मिरवणुकीचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.

मांद्रेच्या इतिहासात प्रथमच शिगमोत्‍सव मिरवणुकीचे आयोजन आमदार जीत आरोलकर यांच्‍या प्रयत्‍नाने करण्‍यात आले. आकर्षक चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य, वेशभूषा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्‍थितांच्‍या डोळ्‍यांचे पारणे फेडले. मांद्रे उदरगत संस्थेचे या चार दिवसीय शिगमोत्सव आयोजनाला सहकार्य मिळाले.

Goa News | Sudin Dhavalikar
Fire In Goa : खोर्जुवेत दोन वाहनांना आग; दीड लाखांचे नुकसान

यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार जीत आरोलकर, मांद्रे शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष रुपेश सावंत, मांद्रे सरपंच ॲड. अमित सावंत, तुये सरपंच सुलक्षा नाईक, गुणाजी ठाकूर, पार्से सरपंच अजय कळंगुटकर, पंच किरण सावंत, रॉबर्ट फर्नांडिस, उपसरपंच तारा हडफडकर, आयोजन समिती महिला अध्यक्ष सुप्रिया खर्बे, सचिव सागर तिळवे, दयानंद मांद्रेकर, प्रशांत नाईक, केरी सरपंच सुलक्षा तळकर, प्रदीप हडफडकर, आगरवाडा सरपंच अँथनी फर्नांडिस, विर्नोडा सरपंच सुजाता ठाकूर, अजय गाड, सुनीता बुगडे, दामोदर नाईक, फटू शेटगावकर, नाना सोपटे केरकर, प्रवीण वायंगणकर, लाडजी नाईक, माजी जिल्हा पंचायत सदस्य श्रीधर मांजरेकर, अजित मोरजकर, किशोर नाईक, उल्हास नाईक आणि मान्‍यवरांची उपस्थिती होती.

Goa News | Sudin Dhavalikar
Mapusa Online Fraud: म्हापशात व्यावसायिकाला 18.27 लाखांचा गंडा तर, बोडगिणी येथून सहा लाखांचे अमली पदार्थ जप्त

"शिगमोत्‍सवातून आपण आपली संस्कृती पुढे नेण्याचे काम करतो. तालुका पातळीवरील शिगमोत्सव मुख्य ठिकाणी होत असतो. एखाद्या वेळी आलटून पालटून तालुक्याच्‍या दोन्ही मतदारसंघांत शिगमोत्‍सव करण्याचाही विचार केला जाईल. आमदार जीत आरोलकर हे कलेला प्रोत्‍साहन देत असून त्‍यांचे कार्य कौतुकास्‍पद आहे."

- रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

"राज्यपातळीवरील अन्नमहोत्सव आणि कार्निव्हल यशस्वी झाल्यानंतर मांद्रे मतदारसंघात आयोजित करण्यात आलेला हा शिगमोत्‍सवही यशस्‍वी झाला. केवळ कला आणि संस्कृती पुढे नेणे एवढाच यामागचा मूळ उद्देश आहे. यातून नवीन कलाकारांना प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे अशा उत्‍सवांचे आयोजन केले जाईल."

- जीत आरोलकर, आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com