Gudi padwa festival Dainik Gomantak
गोवा

‘महामाया विजयते’तर्फे आज शिरोडात गुढीपाडवा उत्सव

सकाळी 6.30 वाजता येथील आवळी भोजन भूखंडात गुढी उभारली

दैनिक गोमन्तक

शिरोडा: भटवाडा-शिरोडा येथील महामाया विजयते संस्थेतर्फे नववर्ष गुढीपाडवा उत्सव येथील श्री महामाया मंदिरात विविध कार्यक्रमांनिशी साजरा केला जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक तथा सरपंच अमित शिरोडकर यांनी दिली. सकाळी 6.30 वाजता येथील आवळी भोजन भूखंडात गुढी उभारली जाईल. सकाळी 9.30 वाजता श्री महामाया मंदिरात श्री सत्यनारायण महापूजा, पुराणवाचन, आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. या पूजेच्या यजमानपदाचा बहुमान पांडुरंग ऊर्फ सुर्लकर यांना लाभला आहे. सायंकाळी पांडुरंग काजरेकर हे संसारफळ पंचांग वाचन करतील. त्यानंतर स्थानिक भजनी कलाकारांचा भजनांचा कार्यक्रम, पावणी होईल. रात्री होणाऱ्या कार्यक्रमाला मंत्री सुभाष शिरोडकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, अभियंते पुंडलिक पारकर, सरपंच अमित शिरोडकर, जि. पं.सदस्‍य नारायण कामत उपस्थित राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT