Goa Tourism Dainiak Gomantak
गोवा

Goa Tourism: गोमंतकीयांसाठी आनंदाची बातमी! GTDC तर्फे पुन्हा हॉलिडे पॅकेजेस सुरू; नव्या 2 बसेसमुळे तीर्थक्षेत्र दर्शन अधिक सोयीस्कर

Goa Tourism Holiday Packages: कोविड काळापासून बंद असलेली हॉलिडे पॅकेजेस आणि पर्यटन टूर योजना पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) पुन्‍हा एकदा सुरू केली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: कोविड काळापासून बंद असलेली हॉलिडे पॅकेजेस आणि पर्यटन टूर योजना पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) पुन्‍हा एकदा सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गोमंतकीयांना अष्टविनायक, तिरुपती, शिर्डी, वालंकिणी आदींसारख्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांची यात्रा करता येणार आहे.

‘जीटीडीसी’तर्फे त्‍यासाठी लवकरच दोन नवीन बसेस खरेदी करण्यात येणार आहेत, अशी माहिती नाईक यांनी दिली. पणजी येथे बुधवारी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत नाईक बोलत होते. यावेळी त्‍यांच्‍यासमवेत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर, उपव्यवस्थापकीय संचालक दीपक नार्वेकर, ‘थॉमस कूक’ आस्थापनाचे प्रतिनिधी रूपेश पर्वतकर आणि इतर मान्‍यवर उपस्थित होते. राज्‍यातील अनेक नागरिकांचे विविध तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्‍याचे स्‍वप्‍न असते.

परंतु, आर्थिकदृष्‍ट्या अनेकांना ते शक्‍य होत नाही. त्‍यामुळेच ‘जीटीडीसी’कडून सहा वर्षांपूर्वी कमी दरामध्‍ये नागरिकांना अशा यात्रा घडवल्‍या जात होत्‍या. सोबतच राज्‍यात येणाऱ्या पर्यटकांनाही अंतर्गत पर्यटनाचा लाभ घेण्‍यासाठी पर्यटन टूर अशी योजना करण्‍यात आली होती. मात्र, कोविडच्‍या काळात या सर्व योजना बंद झाल्‍या होत्‍या. त्‍यानंतर महामंडळाकडून या योजना पुन्‍हा सुरू करण्‍यात येत आहेत. योजनेअंतर्गत गोमंतकीय नागरिकांना तीर्थक्षेत्रांच्‍या यात्रा घडवून आणण्‍यासाठी लवकरच दोन नव्‍या बसेस खरेदी करण्‍यात येणार आहेत.

याशिवाय राज्‍यात येणाऱ्या पर्यटकांना गोव्यातील मंदिरे आणि अंतर्गत भागातील नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन घडवून आणण्यासाठी हॉलिडे पॅकेजेस पुन्हा सुरू करण्यात आली आहेत, असेही नाईक यांनी सांगितले.

...अशी असतील राज्यांतर्गत पर्यटन टूर पॅकेजेस

स्‍थानिक तसेच राज्‍यात पर्यटनासाठी येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना ‘जीटीडीसी’कडून कॅपिटल रिट्रीट, कूल कोस्टलाईन, सदन गेट वे आणि ‘या या मया या’ यांसारखी विविध पॅकेजेस देण्‍यात येणार आहेत.

कॅपिटल रिट्रीट पॅकेज १८,३३५ रुपयांचे असून ते तीन रात्री आणि चार दिवसांचे असेल. पणजी रेसिडेन्सीवरून सुरू होणाऱ्या या पॅकेजमध्ये सिकेरी, फोर्ट आग्वाद, कळंगुट बीच आणि विविध मंदिरांचे दर्शन घडविले जाणार आहे.

कूल कोस्टलाईन पॅकेज १७,५६० रुपयांचे असेल. ते कळंगुट रेसिडेन्सीवरून सुरू होईल. त्यात ब्रेकफास्ट, जेवणाची सोय, बासिलिका चर्च, मंगेशी, शांतादुर्गा मंदिराचे दर्शन आणि रिव्हर क्रूझचा समावेश असेल.

दक्षिण गोव्यातील पर्यटकांच्या सोयीसाठी मडगाव आणि वास्को रेसिडेन्सीवरून १४,४५१ रुपयांचे सदन गेट वे पॅकेज सुरू केले जाईल.

‘या या मया या’ हे पॅकेज मये रेसिडेन्सीवरून ७,१२४ रुपयांत उपलब्ध असेल. त्‍यात हरवळे येथील धबधबा, विठ्ठल मंदिर, कुडणे येथील जैन मंदिर आणि पांडव गुहा या परिसराचा आस्वाद पर्यटकांना घेता येईल. सोबतच एका दिवसाच्या मये टूरचाही या पॅकेजमध्ये समावेश असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT