Manish Jadhav
तारकर्लीचा समुद्रकिनारा त्याच्या अत्यंत स्वच्छ, पांढऱ्याशुभ्र वाळूसाठी आणि पारदर्शक निळ्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. इथले पाणी इतके स्वच्छ आहे की भरती-ओहोटीच्या वेळी समुद्राचा तळ सहज दिसू शकतो.
महाराष्ट्रातील स्कुबा डायव्हिंगसाठी तारकर्ली हे सर्वोत्तम ठिकाण मानले जाते. समुद्राच्या तळाशी असणारे रंगीबेरंगी मासे, जलचर आणि प्रवाळ पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येथे गर्दी करतात.
तारकर्लीपासून जवळच समुद्राच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला अजिंक्य 'सिंधूदुर्ग' किल्ला आहे. बोटीने या किल्ल्याला भेट देणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.
केरळप्रमाणेच तारकर्लीमध्येही कर्ली नदीच्या शांत बॅकवॉटरमध्ये हाऊसओटचा आनंद घेता येतो. नारळ-पोफळीच्या बागांमधून फिरताना मिळणारी ही सफर अतिशय सुखद असते.
तारकर्लीला भेट दिल्यावर अस्सल मालवणी पदार्थांचा आस्वाद घेतल्याशिवाय सहल पूर्ण होत नाही. विशेषतः ताजी मासळी, सुप्रसिद्ध सोलकढी आणि मालवणी वडे हे पदार्थ जिभेवर रेंगाळतात.
तारकर्लीमध्ये पहाटेच्या वेळी समुद्रात सफारीला गेल्यास खेळकर डॉलफिनचे दर्शन होण्याची दाट शक्यता असते. पर्यटकांच्या आकर्षणाचे हे एक प्रमुख केंद्र आहे.
साहसी खेळांची आवड असणाऱ्यांसाठी येथे स्नॉर्कलिंग, पॅरासेलिंग, जेट स्की आणि बनाना राईड असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. समुद्राच्या लाटांवरचा हा थरार मनाला उभारी देतो.
शहरातील गर्दी आणि गोंगाटापासून दूर, निसर्गाच्या कुशीत निवांत वेळ घालवण्यासाठी तारकर्ली हे एक शांत ठिकाण आहे. येथील सूर्यास्ताचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते.