GST Collection Dainik Gomantak
गोवा

GST Collection: GST संकलनात देशात वाढ, गोव्यात घसरण; पर्यटन हंगाम गोव्याला तारणार का?

नोव्हेंबरमध्ये देशातील GST संकलनात 11% वाढ झाली असताना, गोव्यातील GST महसुलात 14% घट झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

देशातील वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) संकलन नोव्हेंबर महिन्यात विक्रमी झाले आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या जीएसटी संकलनाशी तुलना केल्यास यावर्षीचे संकलन ११ टक्के अधिक आहे.सणासुदीच्या दिवसांचा तसेच नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर खर्च झाल्याचा फायदा जीएसटी संकलन वाढण्यासाठी झाला असून सलग नवव्या महिन्यात जीएसटी संकलन विक्रमी झाले आहे. असे असले तरी गोव्यातील GST महसुलात 14% घट झाली आहे.

नोव्हेंबरमध्ये देशातील GST संकलनात 11% वाढ झाली असताना, गोव्यातील GST महसुलात 14% घट झाली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये कमावलेल्या 518 कोटी रुपयांच्या तुलनेत, कर अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात 447 कोटी रुपयांची कमाई नोंदवली. GST अधिकारी आणि उद्योगाला डिसेंबरमध्ये जास्त GST संकलनाची अपेक्षा आहे. कारण गोव्यात डिसेंबर पासून पर्यटनाचा हंगाम सुरु होतो. या काळात देशी आणि विदेशी पर्यटक मोठ्याप्रमाणावर गोव्यात दाखल होतात. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय चार्टर गोव्यात पुन्हा येण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर डिसेंबरच्या कालावधीत गोव्यातून जास्त प्रमाणात GST संकलन होईल अशी अपेक्षा वर्तवली जातेय.

एकूण GST महसूल रु. 1,45,867 कोटी

वित्त मंत्रालयाच्या विधानानुसार, नोव्हेंबर महिन्यात एकूण जीएसटी महसूल संकलन 1,45,867 कोटी रुपये होते. यामध्ये केंद्रीय GST रु. 25,681 कोटी, राज्य GST रु. 32,651 कोटी, एकात्मिक GST रु. 77,103 कोटी आणि उपकर रु. 10,433 कोटी होता. त्यात आयात केलेल्या वस्तूंपासून उपकर म्हणून मिळालेल्या 817 कोटी रुपयांचाही समावेश आहे. या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जीएसटी महसूल मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 11 टक्के अधिक होता. नोव्हेंबर 2021 मध्ये ते 1,31,526 कोटी रुपये होते. सणासुदीच्या खरेदीचे सातत्य आणि वर्षाच्या शेवटी इनपुट टॅक्स क्रेडिट्सचे सामंजस्य इत्यादींनी GST संकलन वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT