Goa Viral Video Dainik Gomantak
गोवा

Viral Video: हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना रोखणार कोण? कारच्या छतावर बसून स्टंटचा व्हिडिओ व्हायरल

पर्यटकांचा एक ग्रुप कारच्या छतावर बसून स्टंट करतानाचा अजून एक व्हिडिओ समोर आला आहे.

Pramod Yadav

Goa Viral Video: गोव्यात पर्यटनाच्या नावाखाली येत काही पर्यटक उत्साहाच्या भरात नियमांना धाब्यावर बसवत चुकीचे कृत्य करत असतात. अशा घटना वारंवार समोर आल्या असून, पोलिस तसेच, पर्यटन विभागाकडून अशाप्रकारे चुकीच्या गोष्टी न करण्याचे आवाहन केले जाते. तरीही काहीजण चुकीची कृत्ये करतात.

नुकतेच काही पर्यटक रेन्ट कारच्या छतावर बसून नाचत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर आता पर्यटकांचा एक ग्रुप कारच्या छतावर बसून स्टंट करतानाचा अजून एक व्हिडिओ समोर आला आहे.

कांदोळी येथील हा व्हिडिओ असून, यात रेन्ट कारच्या छतावर बसून काही तरूण स्टंट करताना दिसत आहेत. कांदोळी पर्यटक माहिती केंद्राजवळील ही घटना असून, कारच्या छतावर दोन तरूण आणि एक तरूण चालकाच्या बाजुला बाहेर उभा असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. भरदिवसा हे पर्यटक नियम मोडताना दिसत असून, या पर्यटकांना पोलिसांचा धाक आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, यापूर्वी अजून एक व्हिडिओ समोर आला असून, यात रेन्ट कॅबच्या छतावर दोन तरूण नाचताना दिसत आहेत. कारचे दोन्ही दरवाजे खुले ठेऊन दोघे छतावर नाचत आहेत, तर, कोणी तरी त्यांचा व्हिडिओ चित्रित करताना दिसत आहे. दरम्यान, याच घटनेचा व्हिडिओ येथील स्थानिकांनी देखील चित्रित केला. व्हिडिओमध्ये GA 03 AH 4948 ही महिंद्रा थार रेन्ट कॅब दिसत आहे.

व्हिडिओ समोर आल्यानंतर सध्या तो सर्वत्र व्हायरल होत आहे. पर्यटकांच्या या कृतीवर सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. लोकांनी पर्यटकांच्या कृतीचा निषेध केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bulbul Film Festival: 'बुलबुल' महोत्सवात विद्यार्थ्यांची मांदियाळी! एकाच दिवशी सहा हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

Alvara Land Goa: घरबांधणीसाठी आल्वारा जमिनी विकू नका! CM सावंतांचा इशारा; वाळपईत आधुनिक कृषी कार्यालयाचे उद्घाटन

Air India Flight Hijack Alert: एअर इंडियाच्या विमानात हायजॅकचा इशारा! 250 प्रवाशांचा जीव टांगणीला; जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

Birch Nightclub Fire Case: बर्च प्रकरणात भरपाईचा सुवर्णमध्य निघणार? 20 लाखांच्या प्रस्तावावर अद्याप शिक्कामोर्तब नाही

Pakistan Poverty Report: खायला अन्न नाही, राहायला घर नाही! पाकड्यांची पोलखोल करणार UNDP रिपोर्ट; 38 टक्के लोक गरिबीच्या खाईत

SCROLL FOR NEXT