Baina Hanuman Temple Dainik Gomantak
गोवा

Baina : पाण्यावरुन वाद पेटला; युवकांकडून पुरोहिताला मारहाण

वास्को बायणा समुद्र किनाऱ्यावरील श्री संकट मोचन हनुमान मंदीरात घडला प्रकार

दैनिक गोमंतक वृत्तसेवा

वास्को बायणा समुद्र किनाऱ्यावर असलेल्या श्री संकट मोचन हनुमान मंदीराचे मुख्य पुरोहीत व त्या मंदीराची देखभाल करणाऱ्यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. काही युवकांकडून मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.

याबाबतची तक्रार मुरगाव पोलिस स्थानकांत नोंद करण्यात आली. संबंधित युवकांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला व नंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली.व मुरगाव तालुक्यातील विविध हिंदू संघटनेच्या पदाधिकाऱ्यां समवेत मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी आरोपींवर कडक कारवाई करा अशी मागणी पोलिस निरीक्षक राघोबा कामत यांच्याकडे केली.

शुकवार (दि.३०) रात्री वास्को बायणा समुद्र किनार्‍यावरील श्री संकट मोचन हनुमान मंदिराची साफसफाई करताना यांच परिसरातील काही युवकांनी मंदिराची देखभाल करणाऱ्यांकडे पाण्याचे पाईप देण्याची मागणी केली. यावेळी मंदीराची देखभाल करणाऱ्यांनी त्या युवकांना हात पाय धुण्यासाठी पाणी दिले. पण काही युवक पाण्याची नासाडी करू लागल्याने मंदीराची देखभाल करणाऱ्यांनी पाण्याचे पाईप काढून घेतले. पाण्याचे पाईप काढून घेतल्याने मंदाराची देखभाल करणार्‍यांना त्या युवकांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मंदीराकडे हाणामारी झाल्याचे वृत्त पुरोहीत दत्तप्रसाद यांना कळताच, तेही मंदीराकडे आपल्या पत्नीसह दाखल झाले. पुरोहीत दत्तप्रसाद यांनी मध्यस्थी करण्याचे प्रयत्न केले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. मारहाणीत मंदीराची देखभाल करणारे मानव नाईक, नार्वेकर, पुरोहीत दत्तप्रसाद व इतर जखमी झाले.

मंदीराकडे येऊन मारहाण केल्याप्रकरणी पुरोहीत दत्तप्रसाद, मानव व नार्वेकर यांनी मुरगाव पोलिस स्थानकांत बायणातील काही युवकांविरोधात रितसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेण्यास व जखमींची आरोग्य तपासणी करण्यास बराच वेळ घेतल्याने पुरोहीत व इतरांनी नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी बायणा परिसरातील संशयित सागर उड्डीगीर, नागराज मदार, हरीयप्पा दोडामणी, नागेश तलवार यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संशयित चार युवकांना अटक करून उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

पोलिस निरीक्षक राघोबा कामत यांनी मुरगावातील सर्व मंदीराबरोबर इतर परिसरात पोलिस गस्त वाढविण्यात येईल अशी माहिती दिली. तसेच बायणा मंदीराकडे मारहाण केल्याप्रकरणी अटक केलेले संशयित मंदीराच्या बाजूस आढळल्यास त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिस निरीक्षक कामत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Unwritten Horizon: ..आपला गोवा काय होता आणि काय बाकी राहिला आहे, हे सांगणारे प्रदर्शन ‘अनरिटन होरायझन’

IFFI 2025: आयसीएफटी युनेस्को गांधीपदक स्पर्धेतील चित्रपट कोणते? पहा लिस्ट..

Kamini Kaushal: 1948 ते 2022! मनोजकुमारचा शहीद ते आमीरच्या लालसिंग चढ्ढापर्यंत कार्यरत असणारी अभिनेत्री 'कामिनी कौशल'

Umrah Pilgrims Accident: सौदी अरेबियात भीषण अपघात! मदिनाजवळ टँकरला धडकून बसला आग, 42 भारतीय यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू

Bihar Election Goa Impact: गोव्याच्या दृष्टीनेही 'बिहार' निकालाचा विचार करणे गरजेचे..

SCROLL FOR NEXT