फेसाळणाऱ्या किनाऱ्यांची रंगत, तरुणाईला आकर्षित करणाऱ्या पार्ट्यांचा जल्लोष आणि सेलिब्रेशनचा मनसोक्त आनंद देणारा गोवा आता जगभरातील पर्यटकांचे आवडते सेलिब्रेशन डेस्टिनेशन झाला आहे. साहजिकच ३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक गोव्यात दाखल झाले. यासोबतच चोरटे आणि ड्रग्स विक्रेतेही आल्याचे समोर आले आहे. कळंगुट आणि हणजुण पोलिसांनी मोबाईल चोरट्यांवर कारवाई करत गजाआड केले आहे. या कारवाईत हणजुण पोलिसांनी वेगवेगळ्या ब्रँडचे 9 मोबाईल तर कळंगुट पोलिसांनी 55 मोबाईल जप्त केले आहेत.
वागातोर येथे सनबर्न फेस्टिव्हलच्या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला चोरांच्या टोळ्या कार्यरत असल्याची माहिती हणजुण पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे हणजुण पोलिसांनी मोहिम राबवत चोरट्यांचा तपास सुरु करण्यात आला. तपासादरम्यान एक संशयित व्यक्ती आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ वेगवेगळ्या ब्रँडचे 9 मोबाईल आढळून आले. यावेळी संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेला संशयिताचे नाव सिराज अहमद शेख आहे. तो महाराष्ट्रातील मुंबई येथील आहे. तक्रारीमध्ये नमूद केलेले मोबाईलचे आयएमईआय नंबर आणि चोरीच्या मोबाईलचे आयएमईआय नंबर चेक केले असता सेम टू सेम आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडील 9 मोबाईल जप्त केले. आतापर्यंत एकूण जप्त झालेल्या मोबाईलची संख्या ४० वर पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेली मोबाईल चोरणारी टोळीचे 18 आरोपी हणजुणच्या पोलिस कोठडीत आहेत.
दुसरी कारवाई कळंगुट पोलिसांनी केली आहे. या कारवाईत 12 मोबाईल चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचे 55 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यांचे बाजारमूल्य 15 लाख रुपये एवढे आहे. पोलिसांच्या तपासणी दरम्यान 12 जणांची टोळी कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे आढळून आले. यावेळी त्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ मोबाईल फोन आढळून आले.
शनिवारच्या कारवाईत रशीद मुल्ला(२१) (रा. आसगाव. मूळ : कुमारगंज-पश्चिम बंगाल, मजीद मिया (२९) बोडकोवड-कळंगुट, मुळ तुफानगंज-पश्चिम बंगाल, मिनरफ मुल्ला (२९) रा. कळंगुट, मूळ कुमारगंज (पश्चिम बंगाल), आदील मलीक (१९) चांदनी महल (दिल्ली), अरविंद गायकवाड (३७), अंबरनाथ-मुंबई, अजय जाधव (४०) भांडुप-मुंबई, खरीजून इस्लाम मुल्ला (३४), कुमार गंज (पश्चिम बंगाल), रहमान जलाउद्दीन अन्सारी (२१) मानखुर्द-मुंबई, मुरली विजय सिंग (१९) उत्तर-प्रदेश, मोहम्मद शबाझ मंजुरी (२७) सेलामपुर-दिल्ली, नाशीत शेख (३४) शिवाजी नगर- मुंबई, सांतु मुल्ला (२२) रा. माड्डोवाडा-कळंगुट मूळ कुमारगंज (पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.