Jai Dhawa Dainik GOmantak
गोवा

Goa: जगप्रसिद्ध ग्रेटर डेन जीनचे दिस्टीलर जय धवन यांचा समूद्रात बुडून मृत्यू

कोलवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी जय आंघोळ करण्यासाठी समुद्रात उतरला ती वेळ भरतीची होती. त्यामुळे पाण्याच्या लाटे बरोबर तो पाण्यात ओढला गेला.

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यात बनविली जाणाऱ्या जगप्रसिद्ध अशा ग्रेटर डेन या जीनचे दिस्टीलर म्हणून लहान वयात किमया साधलेल्या जय धवन (26) यांचे काल रात्री कोलवा येथील समुद्रात बुडून निधन झाले. ही बातमी मद्य उद्योजक वर्तुळासाठी धक्कादायक आहे.

फातोर्डा येथे राहणारा हा उद्योजक युवक आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इतर मित्रांबरोबर काल कोलवा येथे आला होता. त्यानंतर रात्री तो आणि त्याचे आणखी दोन मित्र कोलवा आणि सेर्नाभाटी दरम्यानच्या एकेजागी समुद्र किनाऱ्यावर गेले असता रात्री साडे बाराच्या सुमारास जय याला समुद्रात आंघोळ करायची हुक्की आली. कोलवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी जय आंघोळ करण्यासाठी समुद्रात उतरला ती वेळ भरतीची होती. त्यामुळे पाण्याच्या लाटे बरोबर तो पाण्यात ओढला गेला.

यावेळी त्याचे अन्य दोन मित्र किनाऱ्यावर होते. त्यांनी हा प्रकार पाहिल्यावर त्यांनी तातडीने पाण्यात उतरून त्याला बाहेर काढले. लगेच 108 रुग्णवाहिका आणून त्याला हॉस्पिसियो इस्पितळात आणण्यात आले. मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आल्याची माहिती कोलवाचे पोलीस उपनिरीक्षक अजित वेळीप यांनी दिली.

धवन याचे नाव मद्य उद्योग जगतात प्रसिद्ध असून उच्चभ्रू पर्यटकाकध्ये लोकप्रिय असलेल्या ग्रेटर डेन आणि हापुसा जीन या मद्याचा दिस्टीलर म्हणून त्याने लहान वयातच नाव कमावले होते. रविवारी मडगावच्या जिल्हा इस्पितळात त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Postmen Controversy: गोव्यातील 49 पोस्टमन काढले, त्याजागी महाराष्ट्रीयन भरले; अन्यायाविरुद्ध सरदेसाईंचा हल्लाबोल

Goa Education: आजचे विद्यार्थी उद्याच्या भारताचे शिल्पकार! त्यामुळे 8वी पासून कौशल्य विकासचा अभ्यासक्रमात समावेश; CM सावंत

Bicholim: ..समस्या सोडवा अन्यथा चक्का जाम आंदोलन! गोवा कॉंग्रेसचा इशारा; डिचोली IDC तील रस्ता खड्डेमय

Comunidade Land: नगर्से कोमुनिदादीची जमीन दिल्‍लीतील पार्टीच्‍या घशात! स्‍थानिकांचा आरोप; सरदेसाईंनी वाचा फोडण्‍याची मागणी

Astrology Today: बुधादित्य योगामुळे धनलाभ आणि नव्या संधी; वृषभ, मिथुनराशीसोबत 'या' लोकांसाठी अत्यंत लाभदायक दिवस

SCROLL FOR NEXT