Suktali mollem Car Accident  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News : डिचोलीतील अपघातांत आजोबा ठार; नातीसह दोघे जखमी

अन्य दोन अपघातांत नऊ प्रवासी जखमी

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोलीत दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात स्कूटरवरील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक ठार झाले, तर त्यांच्या नातीसह अन्य दुचाकीवरील एकजण मिळून दोघेजण जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी व्हाळशी येथील आयटीआयजवळ घडला. मृताचे नाव श्रीकांत वसंत मळीक असून, ते हाऊसिंग बोर्ड-बोर्डे येथील रहिवासी होते.

त्यांची नात साईशा सुशांत पळ आणि अन्य दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. यासंबंधीची माहिती अशी की, जीए-०४-पी-४७९७ क्रमांकाच्या दुचाकीवरून साईशा पळ ही डिचोलीच्या दिशेने जात होती. तिच्या मागे तिचे आजोबा श्रीकांत पळ बसले होते.

कच्च्या रस्त्यावरून दुचाकी मुख्य रस्त्यावर घेतानाच डिचोलीहून येणाऱ्या जीए-के-९०४८ या क्रमांकाच्या दुचाकीला तिच्या दुचाकीने जोरात धडक दिली. यात साईशा आणि तिचे आजोबा रस्त्यावर पडले. ते दोघेही गंभीर जखमी झाले. डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना गोमेकॉत नेताना वाटेत श्रीकांत पळ यांचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य दुचाकीस्वारही जखमी झाला आहे.

महिला पोलिस हवालदार अंजनी पीर्णकर यांनी अपघाताचा पंचनामा केला. पोलिस निरीक्षक राहुल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. श्रीकांत यांचा मृतदेह गोमेकॉतील शवागारात ठेवला आहे.

तिनईघाटात कार उलटली

पंचवाडी येथील कुटुंबीय वेलांकिनी येथे गेले होते. दर्शन घेऊन परतताना कारचा टायर फुटून वाहन दरीत कोसळल्याने राजानोरी डिसोझा (६२), तसेच पियाजा डिसोझा (३८) हे गंभीर जखमी झाले, तर पीटर डिसोझा, विलोना डिसोझा, नाय लॉस डिसोझा (२) तसेच नाईस डिसोझा (८) हे किरकोळ जखमी झाले. त्यांना प्रथम रामनगर सरकारी हॉस्पिटलमध्ये प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेतून गोमेकॉत दाखल केले.

मोलेत कार अपघातात तिघे जखमी

मोले-सुकतळी टेट्रा फॅक्टरीजवळ आज दोन कारमध्ये झालेल्या अपघातात छत्तीसगड येथील तिघेजण जखमी झाले. ज्युलिओ रेव्हिडो आणि महिला नरून निसा अशी जखमींची नावे आहेत. तर दुसऱ्या कारमधील चालक मंजुनाथ बी. सिद्धगेरेमठ आणि नागराज अश्विन (दोघेही धारवाड) यांना किरकोळ जखमा झाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT