GPSC Exam Dainik Gomantak
गोवा

GPSC Exam: पाच हजार विद्यार्थी देणार ‘जीपीएससी’

गोवा लोकसेवा आयोगाच्यावतीने कार्मिक विभागासाठी मामलेदार, गटविकास अधिकारी पदासाठी 19 फेब्रुवारी रोजी ही परीक्षा होणार आहे.

दैनिक गोमन्तक

GPSC Exam: गोवा लोकसेवा आयोगाच्यावतीने (जीपीएसी) राज्य सरकारच्या कार्मिक विभागासाठी मामलेदार, गटविकास अधिकारी पदासाठी (बीडीओ) पाच हजार उमेदवार परीक्षा देणार आहेत. 19 फेब्रुवारी रोजी ही परीक्षा होणार आहे.

संगणकावर ही भरती चाचणी परीक्षा होणार असून, लोकसेवा आयोगाने नोव्हेंबर 2022 मध्ये या पदांसाठी जाहिरात काढली होती. या जाहिरातीला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

बीडीओ पदासाठी राज्यभरातून 4000, तर मामलेदार पदासाठी 1 हजार अर्ज आले आहेत. मामलेदारांच्या 14 जागा रिक्त आहेत त्यात 8 खुल्या, 4 ओबीसी, 1 एसटी आणि 1 आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी जागेचा समावेश आहे.

बीडीओच्या दहा पदासाठी ही भरती असेल. त्यात 5 खुल्या, 2 ओबीसी, 1 एसटी, 1 आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठीच्या जागेचा समावेश आहे.

परीक्षेचे असे असेल स्वरुप

बीडीओ पदासाठी तार्किक तर्क आणि योग्यता या क्षेत्रांचा समावेश असलेली प्री स्क्रिनिंग चाचणी असेल. मामलेदारपदासाठी मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांसाठी थेट स्क्रिनिंग परीक्षा असले. प्री स्क्रिनिंगमध्ये 60 गुणांची प्रश्‍नपत्रिका असेल.

मामलेदारपदांसाठी असलेली 75 गुणांची प्रश्‍नपत्रिका 75 मिनिटांत उमेदवारांना सोडवावी लागणार आहे. या पदासाठीच्या परीक्षेत गोवा दमण आणि दीव कृषी भाडेकरार कायदा, सिनेमा फोटोग्राफी कायदा, सिगारेट आणि तंबाखू कायदा, तसेच जमीन महसूल संहिता, मुंडकार कायदा, तसेच तार्किक तर्क याविषयी प्रश्‍न असतील.

इंग्रजी आणि सामान्य ज्ञान, भारतीय संविधान या विषयावरील प्रश्नांचाही समावेश असेल. बीडीओ पदासाठी प्री स्क्रिनिंग उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुन्हा स्क्रिनिंगची परीक्षा द्यावी लागणार आहे. राज्यातील पाच केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT