Goa Assembly Session | CM Dr Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Government Job: वर्षात रिक्त 2, 572 जागा भरणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत माहिती दिली

दैनिक गोमन्तक डिजिटल

CM Pramod Sawant on Goa Government Job Vacancy: राज्य सरकारने आतापर्यंत 20 हजार 546 जणांना सरकारी सेवेत कायमस्वरुपी घेतले आहे. तर रिक्त असलेल्या 2 हजार 572 जागा पुढील मार्च 2024 पर्यंत भरण्यात येतील.

सध्या सरकारी सेवेत 1 हजार 995 जण कंत्राटी पद्धतीवर काम करत असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी दिली. सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी अधिवेशनात याबाबत अतारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता.

2021 साली 802, तर 2022 मध्ये 570 सरकारी कर्मचारी निवृत्त झाले आहेत. 2023 मध्ये 628, तर 2024 मध्ये 527 सरकारी कर्मचारी निवृत्त होण्याच्या वाटेवर आहेत.

निवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागा भरण्यासाठी सरकारने प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती उत्तरादाखल देण्यात आली आहे.

पुढील वर्षी लोकसभा निवडणूक असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर भाजप सरकार ही नोकरभरती प्रक्रिया राबवू शकते, असे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT