Goa Crime News: कसे 'सेफ' वाटेल आम्हाला गोव्यात? बंगळूरच्या महिलेने पतीसोबत घडलेला 'तो' प्रसंग सांगितला, पोलिसही म्हणाले...

गोव्याचे नाव वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे कलंकित होत असल्याचे निदर्शनास येतंय.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak

Goa Crime News: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोवा राज्याचे नाव आता वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे कलंकित होत असल्याचे निदर्शनास येतंय.

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील पर्यटक कुटुंबीयांवर हणजूण येथील एका रिसॉर्टच्या बाहेर चार स्थानिक युवकांनी सुरीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता गोव्यात एका रिसॉर्टमध्ये उतरलेल्या पर्यटकांसोबत घडलेल्या घटनेची माहिती त्याच्या पत्नीने दिली आहे. त्यामुळे राज्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Goa Crime
Anjuna Tourist Attacked : हणजूण येथील पर्यटक हल्ला प्रकरणी पाचही जणांना जामीन मंजूर

या संबंधी शिवांगी त्रिपाठी नामक महिलेले ट्विटरवरून घटनेची माहिती प्रसारित केलीय. सदर महिलेचे पती कामकाजाकरिता बाणावली येथील ग्रँड रॉयल पाम्स रिसॉर्टवर राहिले होते.

रिसॉर्टवरील रूममध्ये ते झोपलेले असताना अज्ञाताने त्यांच्या खोलीत येऊन कॅमेरा, लॅपटॉप आणि आयफोन (अंदाजे किंमत 4 लाख) चोरून नेल्याचे त्या महिलेने सांगितले आहे.

सदर रूममध्ये CCTV नसून घडलेल्या चोरीच्या घटनेविषयी संबंधित हॉटेल व्यवस्थापनाने कानावर हात ठेवले आहेत.

Goa Crime
Goa Crime: पर्यटक रशियन महिलेला मारहाण

विशेष म्हणजे या घटनेची खबर जेव्हा कोलावा पोलिस स्टेशनमध्ये ते देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना चोरीसाठी FIR दाखल करून घेण्यास नकार दिला.

यामुळेच गोवा कितपत सुरक्षित आहे असा सवाल संबंधित महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला आहे.

दरम्यान काही कालावधीनंतर या घटनेची दाखल आयपीएस अधिकारी निधीन वालसन (उत्तर गोवा पोलिस) यांनी घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com