Governor Sreedharan Pillai visited a special school in Bicholim

 

Dainik Gomantak

गोवा

लोकशाहीत जनताच 'सुप्रीम':श्रीधरन पिल्लई

डिचोलीतील विशेष शाळेला राज्यपालांनी दिली भेट

दैनिक गोमन्तक

डिचोली: लोकशाहीत जनता 'सुप्रिम' आहे. असे मत गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई (P. S. Sreedharan Pillai) यांनी व्यक्त करतानाच खरा भारत ग्रामीण भागात दडला आहे. असे नमूद केले. वाठादेव-डिचोली (Bicholim) येथील केशव सेवा साधना विशेष शाळेला शुक्रवारी भेट दिल्यानंतर राज्यपाल श्री. पिल्लई बोलत होते.

यावेळी डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर, मयेचे आमदार प्रवीण झांट्ये, डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर, केशव सेवा साधना संस्थेचे सचिव नाना बेहरे, विशेष शाळेचे अध्यक्ष सागर शेट्ये, डॉ. गुरुप्रसाद कापडी, व्यवस्थापक मकरंद कामत आणि मुख्याध्यापिका संजना प्रभूदेसाई उपस्थित होत्या.

आदरणीय राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी गोव्याची सूत्रे स्विकारल्यानंतर राजभवन आरटीआयखाली आणणे. हा ऐतिहासिक निर्णय आहे. असे सभापती राजेश पाटणेकर यांनी नमूद करून राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी विशेष शाळेला भेट दिल्याबद्दल सभापतींनी समाधान व्यक्त केले. राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांचे शाळेत आगमन होताच शाळेतर्फे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. विशेष मुलांनी सादर केलेले योग पाहून राज्यपाल भारावून गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT