'मतदार गोव्याला राजकीय प्रयोगशाळा बनू देणार नाही': मुख्यमंत्री सावंत

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी शुक्रवारी गोव्यात नव्याने दाखल झालेल्या तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) आणि आम आदमी पार्टीवर (Aam Aadmi Party) निशाणा साधला.
Chief Minister Pramod Sawant

Chief Minister Pramod Sawant

Dainik Gomantak 

Published on
Updated on

देशात आगामी काळात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यात गोवा राज्याचाही समावेश असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. यातच आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी शुक्रवारी गोव्यात नव्याने दाखल झालेल्या तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) आणि आम आदमी पार्टीवर (Aam Aadmi Party) निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले, आगामी 2022 च्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात नव्याने दाखल झालेल्या राजकीय पक्षांना गोव्यातील सुज्ञ मतदार त्यांची जागा दाखवेल.

दरम्यान, मुख्यमंत्री सावंत त्यांच्या मूळ गावी सांखळीम विधानसभा मतदारसंघातील एका जाहीर सभेला संबोधित करत होते, जिथे त्यांनी पुढील वर्षी फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी त्यांच्या निवडणूक प्रचाराची औपचारिक सुरुवात केली.

<div class="paragraphs"><p>Chief Minister Pramod Sawant</p></div>
...सर्वप्रथम गुदिन्हो यांनी आपल्या पदाची जाणीव ठेवावी: नारायण नाईक

सावंत यांनी एमजीपीच्या टीएमसीसोबतच्या युतीवर सडकून टीका केली

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षावर (MGP) राज्याबाहेरुन लोक आणल्याबद्दल टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, "आम्ही माजी मुख्यमंत्री दिवंगत दयानंद बांदोडकर (Dayanand Bandodkar), दिवंगत मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) आणि इतरांचा वारसा पुढे नेत आहोत." मुख्यमंत्री सावंत एमजीपी आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसी यांच्यातील निवडणूकपूर्व युतीचा संदर्भ देत होते, ज्यांनी यावेळी गोव्यात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

तृणमूल काँग्रेसशिवाय, अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी (आप) देखील यावेळी गोव्यात आपले नशीब आजमावत आहे. आम आदमी पक्ष सध्या दिल्लीत सत्तारुढ असून इतर राज्यांमध्येही सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे.

अपरिपक्व सहकारी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, "जनता गोव्याचा वापर राज्याबाहेरील पक्षांकडून राजकीय प्रयोगांसाठी प्रयोगशाळा म्हणून होऊ देणार नाही." 2012 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची आणि त्यांच्या तरुण भाजप समर्थकांची "अपरिपक्व सहकारी" म्हणून खिल्ली उडवली गेली होती, याची आठवण मुख्यमंत्र्यांनी केली.

सांखळीम जागेवरुन आपल्या विजयाचा संदर्भ देताना ते म्हणाले, “या अपरिपक्व सहकाऱ्यांसह मी निवडणूक कशी जिंकू शकेन, असा प्रश्न काही ज्येष्ठांनी विचारला. आमच्या मतदार संघात 50 वर्षांखालील मतदार जास्त होता. परंतु तरीही आम्ही निवडणूक जिंकलो." सावंत यांनी सांखळी मतदारसंघाचे दोनवेळा प्रतिनिधित्व केले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुढे म्हणाले, निवडणुकीसाठी आता फक्त 40 दिवस उरले असून 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान निवडणुका होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com