The Governor to know about the Public Service Commission examination 
गोवा

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची राज्यपालांनी जाणून घेतली माहिती

गोमंतक वृत्तसंस्था

पणजी: गोवा लोकसेवा आयोग कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय संगणकावर आधारीत परीक्षा घेतो आणि त्याचा निकालही तासाभरात जाहीर करतो ही माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज विलक्षण वाटली. त्यांनी या एकंतर प्रक्रियेबाबत आयोगाचे अध्यक्ष जुझे मान्युएल नरोन्हा यांच्याकडून जाणून घेतले.

राज्यपालपदी कोश्यारी आल्यानंतर आज नरोन्हा यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. औपचारीकता म्हणून आयोगाचे काम कसे सुरू आहे. सरकार केलेल्या शिफारशी स्वीकारते का याविषयी त्यांनी विचारणा केली. नरोन्हा यांनी आयोगाचे काम अतिशय पारदर्शीपणे कोणताही हस्तक्षेप न होता चालवत असल्याचे नमूद केले. उदाहरणादाखल बोलताना त्यांनी आयोग पदे भरण्यासाठी ७५ मिनिटांची, ७५ प्रश्नांची केवळ बरोबर उत्तरावर टीक करा या स्वरूपाची परीक्षा घेतो. त्याचा निकाल लगेच तासाभरात जाहीर करतो. त्या उमेदवाराला तीन सदस्यीय समितीसमोर मुलाखत द्यावी लागते. त्यात एका निवृत्त न्यायाधीशाचा समावेश असतो. त्यांनी दिलेला निर्णय आयोग सरकारला कळवते आणि सरकार तो निर्णय स्वीकारते. यामुळे योग्य व्यक्ती योग्य पदावर निवडली जाते, असेही नरोन्हा यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. 

यानंतर राज्यपालांनी आयोगाच्या कामकाजाविषयी अधिक तपशीलाने माहिती जाणून घेतली. नरोन्हा यांनीही आयोगाचे कामकाज, रिक्त जागा, बढतीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची छाननी, खात्यांतर्गत बढती समितीच्या बैठका आदींबाबत माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT