Cashew  Dainik Gomantak
गोवा

Cashew Guaranteed Price: काजू उत्पादकांना सरकारचा दिलासा, लवकरच हमीभाव होणार लागू

मुख्यमंत्री : वाढीव हमीभाव जानेवारीपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू

गोमन्तक डिजिटल टीम

Cashew Guaranteed Price नुकत्‍याच झालेल्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काजूची आधारभूत किंमत 125 रुपयांवरून 150 करण्‍यात आली. त्‍याचा लाभ जानेवारी ते मार्च या कालावधीत काजू विक्री केलेल्‍या शेतकऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावानुसार मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज केली.

येथील कांपाल मैदानावर आयोजित केलेल्या दोन दिवसीय काजू महोत्सवाच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, काजूपासून नवनवीन उत्पादने कशी तयार करता येतील, हे पाहणे गरजेचे असून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या महोत्सवाचे मोठे योगदान असेल.

गोवा वन विकास महामंडळामार्फत दरवर्षी राज्यस्तरीय काजू महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.

‘फेणी’ जीआय मानांकनाचे मद्य

काजूच्या बोंडूपासून बनवलेले ‘फेणी’ हे जीआय मानांकन प्राप्त असलेले देशातील एकमेव मद्य आहे. फेणीला राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळावी, यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आमदार डॉ. दिव्या राणे यावेळी म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT