Goa Farmer Dainik Gomantak
गोवा

Agriculture News : राज्यातील कृषीला चालना ; शेतकरी सरसावताहेत पुढे!

राज्य अन्नधान्य, भाजीपाला तसेच इतर खाद्यपदार्थांच्या अनुषंगाने स्वयंपूर्ण व्हावे यासाठी राज्य सरकारद्वारे विविध योजना तसेच उपक्रमही राबविण्यात येत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Agriculture News : पणजी,गोव्याच्या अर्थकारणात कृषी हे एक प्रमुख क्षेत्र आहे. मागील काही वर्षांत राज्यातील कृषीला चालना मिळाली आहे. राज्य अन्नधान्य, भाजीपाला तसेच इतर खाद्यपदार्थांच्या अनुषंगाने स्वयंपूर्ण व्हावे यासाठी राज्य सरकारद्वारे विविध योजना तसेच उपक्रमही राबविण्यात येत आहेत.

राज्यात पर्यटनासोबत कृषीलादेखील वाव आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक लागवड करावी यासाठी सरकारद्वारे विविध प्रकारच्या सबसिडीदेखील देण्यात येतात. सरकारी योजनांचा लाभ घेत अनेक शेतकरी उत्तमप्रकारे शेती करतात.

परंतु अजूनही भाजीपाला, कडधान्य तसेच इतर खाद्यपदार्थांसाठी शेजारील राज्यांवर अवलंबून राहावे लागते.

राज्यात खरीप तसेच रब्बी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. कुळागार, काजू तसेच इतर प्रकारच्या पिकांची लागवडदेखील होते. राज्यातील एकूण १ लाख ४३ हजार ५४१ हेक्टर क्षेत्रफळ लागवडीखाली आहे.

लागवडीखालील क्षेत्रफळ खालीलप्रमाणे

पिके - क्षेत्रफळ (हेक्टरमध्ये)

भात - ३१,५१९

कडधान्ये आणि तेलबिया - ३,६६७

काजू - ५६,९३४

सुपारी - २,०८१

मिरी - ८६१

मसाले झाडे - २६६

कोकम - ९१

बटाटा - ८१

ऊस - ४९१

आंबा - ५,०७१

केळी - २,४८०

अननस - ३३४

इतर बागायती पिके - ३९८२

भाजीपाला - ८,३७४

नारळ - २६,६८३

ऑइलपाम - ६२६

राज्यात मागील काही वर्षांत भातशेतीमध्ये घट झाली आहे; परंतु राज्यात बागायती तसेच भाजीपाला लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नारळ, मिरी, सुपारी, अननस, तसेच पालेभाज्यांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल आहे. - नेव्हील आल्फोन्सो, कृषी संचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T-20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची एन्ट्री! 'या' देशाच्या स्वप्नांचा केला चुराडा

Magh Purnima 2026: कष्टाचं फळ मिळणार अन् कष्ट दूर होणार! माघ पौर्णिमेला 5 शुभ योगांचा महासंयोग; 'या' राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात

Video: 'अभिषेक झाला, सूर्या झाला'! भारताचा 'हा' फलंदाज आता चोपणार न्यूझीलंडला; प्रॅक्टिसचा व्हिडीओ झाला Viral

Russia Train Attack: 'काळ्या धुराचे लोट अन् रडणाऱ्या प्रवाशांचा आक्रोश'! रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनची रेल्वे सेवा उद्ध्वस्त; 12 जणांचा मृत्यू Watch Video

Shadashtak Yog 2026: "जुनी कर्जे फिटणार, आनंदाचे दिवस येणार!" मंगळ-गुरुचा महासंयोग 'या' राशींसाठी ठरणार भाग्योदयाची नवी पहाट

SCROLL FOR NEXT