Dudhsagar Falls: गोव्यात सध्या टॅक्सीवाल्यांनी पर्यटकांना अडवून जो गोंधळ घातलेला आहे, तो अत्यंत चुकीचा आहे. त्यांच्या या वागणुकीमुळे गोव्यातील संपूर्ण पर्यटन व्यवसायाला डाग लागलेला आहे, असे पर्यटन महामंडळाचे चेअरमन डॉ. गणेश गावकर यांनी धारबांदोडा येथे दूधसागर ऑनलाईन बुकिंग वेबसाईटच्या उद्घाटनावेळी सांगितले.
दरम्यान, यावेळी त्याच्यासोबत राखीव वन विभागाचे उपवनपाल आनंद जाधव जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, दूधसागर जीप असोसिएशनचे अध्यक्ष अशोक खांडेपारकर व समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारने दूधसागर धबधबा पर्यटनस्थळावर येणाऱ्या पर्यटकांची सोय म्हणून ऑनलाईन बुकिंग पद्धत अवलंबली आहे. त्याचा फायदा पर्यटन व्यवसायाला होणार आहे. येथील पर्यटन व्यवसायाला चांगली सेवा मिळावी म्हणून या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करू, असे डॉ. गणेश गावकर यांनी सांगितले.
अशोक खांडेपारकर, दूधसागर जीप असोसिएशनचे अध्यक्ष-
दूधसागर धबधबा ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. या व्यवसायाशी निगडित असलेले काहीजण जीपगाडीची जास्त रक्कम आकारून यापूर्वी त्यांना लुटत होते. सरकारने ऑनलाईन वेबसाईट चालू केल्याने सध्या तरी पर्यटकांना जीपगाड्यांची रक्कम जास्त सांगून लुटायला मिळणार नाही. सरकारने केलेल्या ऑनलाईनचे आपण स्वागत करतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.