Kul-Mundkar Sangharsh Samiti  Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: ...तर ‘मोपा’ विमानतळ सरकारने ताब्यात घ्‍यावा; कूळ-मुंडकार संघर्ष समितीची मागणी

GMR Company: जीएमआर कंपनीला आपण नुकसानीत आहे असे वाटत असेल तर गोवा सरकारने हा विमानतळ ताब्यात घ्‍यावा अशी मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa Airport Update

पेडणे: मोपा विमानतळावर सरकारने कुठल्याही परिस्थितीत जीएमआर कंपनीला ॲरोसिटीसाठी परवानगी देऊ नये. या कंपनीला आपण नुकसानीत आहे असे वाटत असेल तर गोवा सरकारने हा विमानतळ ताब्यात घ्‍यावा, अशी मागणी गोवा कूळ-मुंडकार संघर्ष समितीचे उपाध्यक्ष संजय बर्डे यांनी केली.

पेडणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बर्डे बोलत होते. यावेळी समितीचे संघटक दीपेश नाईक, नारायण गडेकर, सितेश मोरे व सूरज कांबळी उपस्थित होते.

बर्डे म्‍हणाले की, मोपा विमानतळासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने घेतल्या आहेत. या शेतकऱ्यांना अजूनही त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. उलट जीएमआर कंपनीकडून अद्याप राज्‍य सरकारला एकही पैसा मिळालेला नाही. त्‍यातच मुख्यमंत्री २२० कोटींचा महसूल या कंपनीला माफ करून गोमंतकीयांच्‍या पैशांनी त्‍यांची तिजोरी भरत आहेत. आता एवढी जमीन घेऊनही, विमानतळ बांधून पूर्ण झाल्‍यानंतर तो नुकसानीत असल्याचा कांगावा जीएमआर कंपनी करत आहे.

संजय बर्डे (उपाध्‍यक्ष, गोवा कूळ-मुंडकार संघर्ष समिती)

मोपा विमानतळासाठी स्थानिकांच्या जमिनी कवडीमोल दराने गेल्या, मात्र आता टॅक्सीव्यवसाय करताना त्यांना विविध समस्‍यांना सामोरे जावे लागत आहे. पार्किंग शुल्कासह काही दिवसांनी त्‍यांना टोल आकाराला जाणार आहे. या लोकांनी आपल्‍या जमिनी मोपा विमानतळासाठी खूपच कमी दराने दिल्‍या आहेत. कारण नोकरीची आशा होती. त्‍याचे हेच काय फळ त्‍यांना देण्‍यात आले आहे?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT