Sadguru Dainik Gomantak
गोवा

Sadguru: 'सरकारने भविष्यासाठी गुंतवणूक करावी' सद्‍गुरूंचा सरकारला संदेश

हजारो गोमंतकीय समुदायाच्या उपस्थितीत इशा फाऊंडेशनचे संस्थापक योगी सद्‍गुरू जग्गी वासुदेव यांनी माती वाचवा संदेश दिला.

दैनिक गोमन्तक

पणजी: हजारो गोमंतकीय समुदायाच्या उपस्थितीत इशा फाऊंडेशनचे संस्थापक योगी सद्‍गुरू जग्गी वासुदेव यांनी माती वाचवा संदेश दिला. फाऊंडेशनच्या वतीने राज्य सरकारबरोबर त्यांनी ‘सेव्ह सॉईल’ याविषयी सामंजस्य करार केला. जमिनीचा मानवी जीवनाशी किती जवळून संबंध आहे, हे सद्‍गुरू यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना पटवून दिले.

(Government should invest for the future Sadguru's message to the government)

आज मंगळवारी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये खचाखच भरलेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कृषी मंत्री रवी नाईक, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांची उपस्थिती होती.

राज्यातील नैसर्गिकरीत्या शेतीची अधिकाधिक वृद्धी व्हावी, यासाठी शंभरटक्के शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड व माती आरोग्य कार्ड दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

सरकारने भविष्यासाठी गुंतवणूक करावी

कोरोना काळात जागतिक आरोग्य संघटनेने मानसिक आरोग्य बिघडणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे म्हटले आहे. कोरोना काळात विविध देशात विविध प्रकारच्या आजाराने लोकांनी जीव गमावले. लोकांना योगाचे महत्त्व पटले असून त्यामुळे जीवन सुखकारक बनत आहे असे सांगत सद्‍गुरू म्हणाले की, नागरिकांनी कोणत्याही संकटाक सामुहिकरित्या हातात हात घालून उभे राहिले पाहिजे. सरकारला देशाच्या कल्याणासाठी पुढील भविष्याचा विचार करून गुंतवणूक करण्यास भाग पाडणे हेच जनतेचे कर्तव्य आहे.

माती हेच जीवनाचे मूळ

भोवतालच्या सर्व गोष्टी मातीपासून आलेल्या आहेत, प्रत्येक गोष्ट आपणास जमिनीतून मिळते. अगदी आपल्या शरीरापासून प्रत्येक बाब ही जमिनीची देण आहे. आम्ही ते विसरत आहोत आणि त्या गोष्टीचा स्रोत शोधत राहतो. या भूतलावर असणाऱ्या अब्जावधी सूक्ष्मप्रजाती असतात, त्याच खऱ्या जीवनाचा पाया आहेत’ असे म्हणत सद्‍गुरुंनी जीवनाचा माती हा एक भाग आहे, हे पटवून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT