Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: सरकारने पोटापाण्याची व्यवस्था करावी- रेती वाहतूकदार

रेती वाहतूकदारांची हाक:- रेती उपशावरील बंदीमुळे उपासमारीची वेळ

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात रेती उपसावर बंदी व बेकायदेशीर रेती उपसा व वाहतुकीवर सरकारने कडक निर्बंध घातल्यामुळे रेती वाहतुकीत असलेल्या वाहतुकदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने रेती उपसा व रेती वाहतूक पूर्ववत सुरू करण्यास त्वरित उपाय योजना आखण्याची मागणी वाहतुकदारांनी केली आहे.

दक्षिण गोवा रेती वाहतूकदार संघटनेचे सोनल देसाई यांनी कुंकळ्ळीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या व्यथा व्यक्त केल्या. रेती वाहतूक पूर्ववत सुरू करण्याची पुन्हा मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असून सरकारने या संदर्भात ठोस उपाययोजना न आखल्यास वाहतूकदार रस्त्यावर उतरण्यास मागे राहणार नाही, असा इशारा त्यांनी वाहतुकदारांच्या वतीने दिला. रेती वाहतुकदारांना काम नसल्यामुळे उपासमारीची पाळी आली आहे, असे रेती वाहतूक संघटनेतर्फे सांगण्यात आले.

नेमकी मागणी काय?

सरकारकडून कुडाळच्या रेतीसाठी प्रत्येक फेरीमागे पाचशे रुपयांचे शुल्क आकारले जाते, तशाच प्रकारचे ऑनलाईन पोर्टल सुरू करून सुव्यस्थित रेती व्यवसायाला मान्यता देण्यासाठी सरकारने कायदेशीर तोडगा काढावा. रेती वाहतुकीवर सुमार पाचशे कुटुंबे निर्भर असून एक तर सरकारने या व्यावसायिकांना काम द्यावे अन्यथा बस मालकासाठी जशी पॅकेज दिली आहे. तशीच पॅकेज रेती वाहतुकदारांना द्यावी, अशी वाहतूकदारांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

SCROLL FOR NEXT