Mahadayi Water Dispute: ‘म्हादई’वरून तापणार हिवाळी अधिवेशन

विरोधकांची रणनीती ठरली : 134 तारांकित, तर 475 अतारांकित प्रश्‍न
Goa
GoaDainik Gomantak

राज्यात गाजत असलेल्या म्हादई प्रश्‍नावरूनच सोमवारपासून सुरू होत असलेले हिवाळी अधिवेशन तापणार, हे विरोधकांनी ठरवलेल्या रणनीतीवरून स्पष्ट झाले आहे. या चारदिवसीय अधिवेशनासाठी 134 तारांकित, तर 475 अतारांकित प्रश्‍न आले आहेत, अशी माहिती विधानसभा सचिव नम्रता उल्मन यांनी दिली. तथापि, विविध प्रश्‍नांवरून विरोधकांनी या अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे.

कर्नाटक आणि गोव्यामध्ये गाजत असलेल्या म्हादई प्रश्‍नावरून स्वतंत्र अधिवेशन घ्यावे किंवा म्हादईच्या विषयावर स्वतंत्र चर्चा व्हावी, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक आक्रमक आहेत. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्येही हा विषय तापला होता. विरोधकांनी हीच मागणी करत सरकारवर टीकास्त्र सोडले होते. आता प्रत्यक्षात सोमवारपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटणार, हे स्पष्ट झाले आहे.

विधानसभा सदस्यांनी134 तारांकित, तर 475 अतारांकित प्रश्‍न विचारले असले, तरी हे चारदिवसीय अधिवेशन म्हादई या विषयावरूनच गाजणार आहे. या वर्षातील हे पहिले अधिवेशन असल्याने सोमवारी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई अभिभाषण करतील. तर 17 आणि 18 जानेवारीला या अभिभाषणावर आभाराची चर्चा होईल. 19 जानेवारीला संपूर्ण दिवस म्हादई विषयावर चर्चा होईल, असे सरकारने आधीच जाहीर केले असून कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्येही यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

Goa
Mahadayi Water Dispute: म्हादईवरून ‘आरजी’मध्ये फूट!

विर्डी सभेचे पडसाद उमटणार!
सोमवार, 16 जानेवारी रोजी जनमत कौल दिन असून त्याच दिवशी म्हादई प्रश्‍नावरून विर्डी-साखळी येथे सर्व विरोधकांनी भव्य जाहीर सभा घेण्याचे निश्‍चित केले आहे. या सभेला सर्व सहाही विरोधी आमदार उपस्थित राहणार आहेत. ‘आरजी’चे आमदार वीरेश बोरकर यांनीही म्हादई आंदोलनाला पाठिंबा दिला असून कदाचित तेही या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी विरोधकांशिवाय अधिवेशन चालणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Goa
Goa Petrol-Diesel Price : गोव्यातील इंधनाच्या दरात किरकोळ बदल; जाणून घ्या आजचे पेट्रोल - डिझेलचे दर

सरकारतर्फे १३ विधेयके
या अधिवेशनात सरकारतर्फे 13 विधेयके मांडली जाणार असून ती मंजूर करून घेण्यात येतील. याशिवाय 2022-23 सालच्या पुरवण्या मागण्यांवर सादरीकरण, चर्चा आणि मतदान होईल. सरकारतर्फे सादर केलेल्या विधेयकांमध्ये अबकारी कर, शिक्षण विकास महामंडळ, कामगार कल्याण निधी, पर्यटन व्यापार नोंदणी, जमीन विकास आणि इमारत उभारणी, पालिका, कृषी, यासारख्या महत्त्वाच्या विधेयकांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com