School  Dainik Gomantak
गोवा

डिचोली केंद्रशाळेच्या नवीन इमारतीचे काम अंतिम टप्प्यात

तांत्रिक अडचण : शैक्षणिक वर्षारंभी वर्ग भरणे मात्र अशक्य; जुन्या इमारतीतच वर्ग

दैनिक गोमन्तक

डिचोली : जवळपास पाच वर्षे रेंगाळलेल्या डिचोलीतील सरकारी केंद्र शाळेच्या नवीन इमारतीचे काम पूर्णत्त्वाच्या मार्गावर असले तरी येत्या शैक्षणिक वर्षांरंभीपासून नवीन इमारत प्रकल्पात शाळेचे वर्ग भरण्याची शक्यता अंधुक बनली आहे.

या इमारतीचे अंतिम टप्प्यातील काम तांत्रिक अडचणीमुळे लांबणीवर पडले आहे. परिणामी या शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन इमारतीत प्रवेश करण्यासाठी आणखी किमान दोन ते तीन महिने तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षापासून काही दिवस सध्याच्याच पोलिस ठाण्याच्या जुन्या इमारतीत ज्ञानार्जन करावे लागणार आहे.

मोठा इतिहास असलेल्या आणि केंद्रशाळा म्हणून परिचित असलेल्या डिचोलीतील सरकारी शाळेसाठी पूर्वीच्याच जागेत 11 कोटींहून अधिक रुपये खर्च करून सर्व साधनसुविधांनीयुक्त अशी भव्य इमारत उभारण्यात आली आहे. गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळातर्फे हा प्रकल्प उभारण्यात येत आहे.

काम अजून रेंगाळलेले

1. महिन्यापूर्वी म्हणजेच गेल्या 13 एप्रिल रोजी जीएसआयडीसीचे अधिकारी आणि कंत्राटदारासमवेत आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी या प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली होती.

2. कामाची गती पाहता चालू मे महिन्याच्या अखेरपर्यंत ही इमारत शिक्षण खात्याच्या ताब्यात मिळणार असल्याचे संकेत त्यावेळी मिळाले होते.

3. संबंधीत कंत्राटदारानेही मे महिन्यापर्यंत इमारत शिक्षण खात्याच्या ताब्यात देण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती.

4. ऑगस्टदरम्यान या प्रकल्पात शाळेचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे श्रीकृष्ण धोंड यांनीही या माहितीस दुजोरा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT