Government Scheme  Dainik Gomantak
गोवा

Government Scheme : योजना लोकांपर्यंत नेण्याचा ध्यास: डाॅ. दिव्या राणे

Government Scheme : होंडा येथे ‘विकसित भारत संकल्प’ला प्रतिसाद

गोमन्तक डिजिटल टीम

Government Scheme : वाळपई, सरकारच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचा आपल्याला ध्यास आहे. ‘विकसित भारत संकल्प यात्रा’द्वारे या योजनांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्याने गरजूंना मोठा दिलासा मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना खरोखरच लाभदायी असून यात्रेतून सर्व योजना लोकांपर्यंत पोहचत आहेत,असे प्रतिपादन पर्येच्या आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी केले.

होंडा पंचायतीत आयोजित ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या उद्‍घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.यावेळी होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, होंडा सरपंच शिवदास माडकर, उपसरपंच रेशम गावकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, सत्तरी बीडीओ सूर्याजीराव राणे तसेच सर्व पंच व अधिकारी राजेंद्र आर्लेकर, डाॅ. अतुल पै बीर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना डाॅ. राणे म्हणाल्या, दिवसेंदिवस सरकारच्या योजना सुटसुटीत होत आहेत. शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, दिव्यांग असो किंवा इतर विविध माध्यमातून त्यांना योजनाव्दारे रोजगार देण्याची संधी दिली जात आहे.

आॅललाईन सेवेमुळे प्रत्येक लाभार्थीच्या खात्यात थेट पैसे येतात. त्यामुळे सर्व व्यवहार पारदर्शक आहे. प्रत्येक पंचायतीत स्वयंमित्रांची नेमणूक करण्यात आली आहे. सरकारतर्फे ‘आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण भारत’ची संकल्पना राबविण्यात आली आहे. या योजनांमुळे अनेकांना लाभ होत आहे.

विकसित भारत संकल्प यात्रा सुरू होऊन ५० दिवसही झाले नाहीत, परंतु आतापर्यंत ही यात्रा२.२५ लाख गावांमध्ये पोहोचली आहे.

डॉ. राणे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देत नवीन वर्षाचे सर्वांनी नव सकंल्प करून सत्तरीचा विकास करूया, असेही आवाहन उपस्थितांना केले. बीडीओ सूर्याजीराव राणे यांनी सर्वांना शपथ दिली. स्वागत शिवदास माडकर यांनी केले. सूत्रसंचालन आसावरी कुलकर्णी यांनी केले. मालू वरक यांनी आभार मानले.

या योजनांची मिळते माहिती

विकसित भारत संकल्प यात्रेत आयुष्मान भारत योजना, पीएम गरीब कल्याण योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, पीएम आवास योजना, पीएम उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, पीएम किसान सन्मान योजना, किसान क्रेडीट कार्ड, पीएम पोषण अभियान, हर घर जल, जल जीवन मिशन, स्वामित्व योजना,

जनधन योजना, जीवन ज्योती योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, पीएम प्रणव, शिष्यवृत्ती योजना, वनहक्क दावे, वन धन विकास केंद्र योजना आदि योजनांची ग्रामीण भागात माहिती दिली जात आहे. त्यांचा लाभ घ्यावा,असे आवाहन आमदार डॉ.दिव्या राणे यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Jail Administration Report: 'राज्यातील कारागृहांच्या स्थितीचा सविस्तर अहवाल द्या', गोवा खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश; ‘सर्वोच्च’ निकालाची दखल

Goa Politics: ‘आरजीपी’तील अंतर्गत वादाबाबत आमदार बोरकरांची अप्रत्यक्ष पुष्‍टी; आल्‍मेदांवर कारवाईवर चर्चा सुरु असल्‍याचेही केले स्‍पष्‍ट

Haath Kaatro Khamb History: "लोकांचे हात कापले जायचे, याचे पुरावे कुठे?" फेरेरांच्या सवालाने 'हात कातरो' खांबाचा वाद विकोपाला; पुराव्यांच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड?

Mandovi River Casino: मांडवीतील कॅसिनोंचे भवितव्य टांगणीला! 'इनफ इज इनफ'च्या याचिकेवर हायकोर्टात जोरदार खडाजंगी; सरकारचा आक्रमक पवित्रा

Ponda Assembly Bye-Election: कोर्टाच्‍या निकालानंतर गप्‍प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल; फोंडा पोटनिवडणूकप्रश्‍‍नी आयोगाला द्यावी लागणार उत्तरे!

SCROLL FOR NEXT