Mopa Taxi Association Protest Dainik Gomantak
गोवा

Mopa Taxi Association Protest: कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास सरकार जबाबदार; आंदोलकांचा इशारा

‘मोपा’वरील अधिसूचित टॅक्सी स्थानकाच्या मागणीसाठी धरणे आंदोलन

दैनिक गोमन्तक डिजिटल

Mopa Taxi Association Protest: मोपा विमानतळावर अधिसूचित टॅक्सी स्थानक देण्यात यावा. या मागणीसाठी दिलेली मुदत संपल्याने सोमवारी (ता.१) नागझर येथे मैदानावर ग्रीन फिल्ड मोपा टॅक्सी असोसिएशन व मोपा लोकल टॅक्सी असोसिएशनने आपल्या टॅक्सी बंद ठेवून धरणे आंदोलन सुरू केले.

ही मागणी मान्य झाली नाही तर उद्यापासून रस्त्यावर उतरू. कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास या सर्वांची जबाबदारी ही सरकारवर असेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

या धरणे आंदोलनात मोठ्या प्रमाणात आपल्या गाड्या बाजूला उभ्या करून टॅक्सीमालक सहभागी झाले. यावेळी संघटनेचे नेते भास्कर नारुलकर म्हणाले की, गेले पाच महिने आम्ही टॅक्सी स्थानक मिळावा म्हणून प्रयत्न करीत आहोत.

या विमानतळासाठी जमिनी गेलेल्यांना त्याचबरोबर स्थानिक व तालुक्यातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा, अशी आमची मागणी आहे.

या स्थानकावर आपल्या टॅक्सी लागतील म्हणून सुमारे अडीचशेपेक्षा जास्त जणांनी बॅंकचे कर्ज घेऊन गाड्या घेतल्या आहेत. त्यांचे हप्तेही सुरू झाले आहेत.

त्यांनी काय करावे? यावेळी ॲड. प्रसाद शहापूरकर, ॲड. जितेंद्र गावकर यांनी राज्यातील टमाम टॅक्सीधारकांनी आमच्या मागणीसाठी पाठिंबा द्यावा. सरकार व स्थानिक आमदार हा विषय हाताळण्यासाठी अपयशी ठरल्याने आज हा प्रसंग आलेला आहे, असे सांगितले.

आणखी दुसरा पर्याय नाही

ग्रीन फील्ड मोपा एअरपोर्ट टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष उदय महाले, मोपा लोकल टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुवेक गावस, स्थानिक टॅक्सीचालक बाबू वरक यांनी सांगितले की, शांततेच्या मार्गाने आम्ही आतापर्यंत आमच्या मागण्या मांडत आलो; पण सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आलेले आहे. आता रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

"केंद्राचे वाहतुकीसंदर्भात जे नियम आहेत त्याच नियमांची येथेही अंमलबजावणी झाली पाहिजे. कुणालाही जास्त रक्कम देण्याची आवश्यकता नाही.

वारखंड-नागझरचे पंचायत सदस्य देविदास च्यारी, कासारवर्णेचे माजी सरपंच रमेश पालयेकर यांनी यावेळी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला."

गंगाराम फडते, सचिव, गोवा राज्य टॅक्सी असोसिएशन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Career and Money Horoscope: करिअरमध्ये यश, पैशांत वाढ! वाचा दैनिक भविष्य; जाणून घ्या ग्रहांचे संकेत

Cutbona Jetty: 'माशे मेंळ्ळे ना'! समुद्र अजून खवळलेला, कुटबण जेटीवर मजूर परतले; ट्रॉलरमालकांची वाढली लगबग

Goa Assembly Live: जपान आणि अमेरिकेच्या काही भागात स्थलांतराचा इशारा

Illegal Liquor Goa: सासष्‍टीत सर्वाधिक बेकायदा दारू धंदा! 5 वर्षांत 1395 प्रकरणे नोंद; नव्‍याने 2365 परवाने

Goa Crime: धमकी, खून - अत्याचाराचा प्रयत्न! आरोपीला 10 वर्षांचा कारावास; फास्ट ट्रॅक न्यायालयाचा निवाडा

SCROLL FOR NEXT