Dabolim शिंदोळी साकवाळ येथे भग्नावस्थेत असलेली सरकारी शाळा इमारत. Dainik Goamantak
गोवा

साकवाळ येथील सरकारी प्राथमिक शाळा चार वर्षापासून 'भग्नावस्थेत'

शाळेचा संपूर्ण परिसर झाडाझुडपांनी वाढलेला असल्याने अंगणवाडीत येणाऱ्या लहान मुलांना यापासून धोका निर्माण झाला आहे.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: साकवाळ पंचायत क्षेत्रातील शिंदोळी येथील सरकारी प्राथमिक शाळा (school) चार वर्षापासून विद्यार्थी नसल्याने भग्नावस्थेत पडून आहे. शाळेचा संपूर्ण परिसर झाडाझुडपांनी वाढलेला असल्याने अंगणवाडीत येणाऱ्या लहान मुलांना यापासून धोका निर्माण झाला आहे. शाळेचा उपयोग फक्त निवडणुकीपुरतीच होत आहे.

शिंदोळी साकवाळ येथे भग्नावस्थेत असलेली सरकारी शाळा इमारत.

मुरगाव तालुक्यातील साकवाळ शिंदोळी गावात असलेली सरकारी प्राथमिक शाळा विद्यार्थी नसल्यामुळे बंद स्थितीत असून शाळेच्या इमारतीची भग्नावस्था झाली आहे. इमारतीचा ताबा शिक्षण खात्याकडे असून सुद्धा या इमारतीची दुरुस्ती, परिसर स्वच्छ ठेवणे आदी गोष्टीवर नियंत्रण ठेवणे सरकारची जबाबदारी आहे. शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे इमारतची दुर्दशा झालेली पाहण्यास मिळते. सध्या या शाळेच्या इमारतीला झाडे, वेलीनी वेढलेली आहे. त्यामुळे हा शाळेचा परिसर जंगलमय झाला आहे. या इमारतीच्या बाजूलाच लहान मुलांसाठी अंगणवाडी असून या अंगणवाडीत लहान मुलांची ये-जा असते. मात्र इमारती सभोवताली झाडाझुडपामुळे या लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात यांनी नुकतीच या भागाला भेट देऊन या शाळेच्या इमारतीची पाहणी केली असता सत्य परिस्थिती तिच्या लक्षात आली. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की सदर शाळेच्या इमारतीची स्थिती भयावह झाली असून सरकारने या शाळेकडे लक्ष पुरवून आवश्यक ती डागडुजी करावी.

मी जिल्हा पंचायत सदस्य या नात्याने या विषयी सरकारदरबारी या शाळे विषयी विषय मांडून माझ्या परीने लक्ष पुरविणार असल्याचे त्या म्हणाल्या. या शाळेची डागडुजी करून महिला मंडळ तसेच स्वयंसहाय्य गटांना उपयोगात आणण्यास माझा प्रयत्न असेल असे शेवटी थोरात यांनी सांगितले.

येथील एक नागरिक गिरीश बोरकर यांनी सदर शाळेचा उपयोग फक्त निवडणुकीपूर्तीच होत असतो. मग ही शाळा धूळखात पडते. त्यामुळे शाळेची भग्नावस्था झाल्याचे ते म्हणाले. आता निवडणूक जवळ आली आहे. तेव्हा निवडणूक कामासाठी सदर शाळेचा उपयोग करणार आहे. मात्र सध्याची शाळेची परिस्थिती पाहिल्यास निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी शाळेचे वर्ग राहण्यायोग्य नसल्याने दृष्टीपथास पडत आहे. तसेच शाळेचे शौचालय एकदम घाणेरडे अवस्थेत आहे. तसेच या शाळेशेजारी वाढलेल्या झाडा झुडपामुळे येथील अंगणवाडी येणाऱ्या लहान मुलांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे. तेव्हा सरकारने याविषयी जातीने लक्ष घालून शाळेला नवजीवन द्यावे जेणेकरून या गावातील मुलांना याचा फायदा होईल. तसेच एखाद्या महिला मंडळ किंवा स्वयंसहाय्य गटांना सदर शाळा इमारत उपयोगात आणण्यास घ्यावी असेही त्याने यावेळी सुचवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT