Goa Mines Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: जैवसंवेदनशील क्षेत्रात पुन्हा खाणी सुरू करण्याचा सरकारचा डाव! नदी काठचे बागायतदार चिंतेत

Eco Sensitive Zone: रिवण आणि कोळंब येथील खाणी पुन्हा सुरू केल्यास या भागातील जीवनदायिनी असलेल्या कुशावती नदीवर विपरीत परिणाम

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: दक्षिण गोव्यातील रिवण आणि कोळंब या जैवसंवेदनशील गावांजवळ पुन्हा एकदा खाणी सुरू करण्याचा डाव सरकारने आखला आहे. त्यामुळे पर्यावरणावर तर विपरीत परिणाम होणारच, शिवाय या भागांतून वाहणाऱ्या कुशावती नदी किनारी असलेल्या असंख्य बागायतींना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तेथील बागायतदार चिंतेत सापडले आहेत.

गोवा सरकारच्या खाण खात्याने १२ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या निविदा सूचनेत उत्तर गोव्यातील होंडा येथील एक तर दक्षिण गोव्यातील कोडली आणि कुर्पे-सुळकर्णे या भागातील दोन अशा एकूण तीन खाणपट्ट्यांचा लिलाव जाहीर केला आहे. यातील कुर्पे-सुळकर्णे हा पट्टा रिवण आणि कोळंब या जैवसंवेदनशील गावांजवळ आहे. या भागात ज्या खाणी आहेत, त्या या दोन्ही गावांपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर आतल्या भागात आहेत. हा भाग जैवसंवेदनशील क्षेत्रात असल्याने तिथे खाणी सुरूच कशा होऊ शकतात? असा सवाल स्थानिक बागायतदार करू लागले आहेत.

सरकारला या जैवसंवेदनशील गावांमध्‍ये पुन्हा खाणी का सुरू करायच्‍या आहेत तेच कळत नाही, अशी प्रतिक्रिया या भागातील बागायतदार व्यंकट प्रभुदेसाई यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, या पट्ट्यात असलेली बद्रुद्दीन मवानी खाण कोळंब गावाला अगदी जवळ आहे. हा गाव यापूर्वीच जैवसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तेथे कायद्यानुसार खाणी चालवता येत नाहीत.

पर्यावरण कार्यकर्ते शेतकरी राम वेळीप यांनीही हा खाणपट्टा पुन्हा सुरू केल्यास स्थानिक शेतकऱ्यांवर संकट येईल अशी भीती व्यक्त करून होणारा पर्यावरणीय ऱ्हास कित्येक पटीने अधिक असेल, असे सांगितले.

‘कुशावती’च्‍या गळ्‍याभोवती फास

रिवण आणि कोळंब येथील खाणी पुन्हा सुरू केल्यास या भागातील जीवनदायिनी असलेल्या कुशावती नदीवर विपरीत परिणाम होईल. यापूर्वी या नदीत खाणीमुळे मोठ्या प्रमाणावर मातीचा भराव शिरून नदीचे पाणी प्रदूषित होण्याबरोबरच या नदीचे पात्र उथळ बनले होते. मागची बारा वर्षे खाणी बंद असूनही हा गाळ कमी झालेला नाही. जर खाणी पुन्हा सुरू झाल्या तर कुशावतीचा गळा आणखी आवळला जाईल आणि या नदीच्या काठच्‍या बागायती नष्‍ट होतील.

कुर्पे-सुळकर्णे खाणपट्टा जैवसंवेदनशील क्षेत्रात येत नाही. या पट्ट्याची निविदा जारी करण्यापूर्वी आम्ही त्याची खात्री करून घेतली आहे. त्यामुळे ही लिलाव प्रक्रिया विनाव्यत्यय पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे.
नारायण गाड, खाण संचालक
कुर्पे-सुळकर्णे खाण ब्लॉकमध्ये कुठला भाग येतो आणि त्या भागातील कुठल्या खाणी पुनर्जीवित करणार, यावर आमचा अभ्यास सुरू आहे. हा भाग जर जैवसंवेदनशील क्षेत्रात असेल तर सरकारच्या निर्णयाला आम्ही आव्हान देऊ.
रवींद्र वेळीप, पर्यावरणप्रेमी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

SCROLL FOR NEXT