taxi driver incentives Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi Driver App: अखेर गोवा सरकारने लॉन्च केले टॅक्सी अ‍ॅप; चालकांना मिळणार 25 लिटर पेट्रोल, डिझेल, CNG मोफत

स्थानिक टॅक्सी चालकांना सक्षम बनवण्यासाठी आणि प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी गोवा टॅक्सी ड्रायव्हर ॲप' नावाचे नवे ॲप्लिकेशन गोव्यात उपलब्ध झाले आहे

Akshata Chhatre

पणजी: गोवा सरकारने वाहतूक आणि पर्यटन विभागाच्या माध्यमातून स्थानिक टॅक्सी चालकांना सक्षम बनवण्यासाठी आणि प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 'गोवा टॅक्सी ड्रायव्हर ॲप' (Goa Taxi Driver App) नावाचे नवे ॲप्लिकेशन आता गोव्यात उपलब्ध झाले आहे, जे गोव्याच्या वाहतूक क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवण्यास मदत करेल.

पहिल्या ५०० ड्रायव्हर्सना २५ लिटर इंधन मोफत

या नवीन उपक्रमाचा एक भाग म्हणून, पहिल्या ५०० टॅक्सी चालकांना एक विशेष ऑफर दिली जात आहे. जे ड्रायव्हर्स ॲप-आधारित ५० राइड्स पूर्ण करतील, त्यांना २५ लिटर इंधन (पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजी) मोफत दिले जाईल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी चालकांना ३० दिवस सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ॲपवर सक्रिय राहावे लागेल.

डिजिटल परिवर्तनाचा भाग व्हा!

हा ॲप केवळ टॅक्सी चालकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणार नाही, तर प्रवाशांनाही अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव देईल. गोवा सरकारचा हा प्रयत्न राज्याच्या वाहतूक क्षेत्राला डिजिटल युगात आणण्यासाठी महत्त्वाचा आहे.

टॅक्सी चालकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी आजच हे ॲप डाउनलोड करावे, अधिक स्मार्ट पद्धतीने ड्रायव्हिंग करावे आणि गोव्याच्या वाहतूक क्षेत्रातील या डिजिटल परिवर्तनाचा भाग बनावे. कोणत्याही मदतीसाठी, हेल्पलाईन क्रमांक १३६४ वर संपर्क साधता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coal Scam: 'कोळसा कंपन्‍यांकडून 3 ते 4 हजार कोटींचा घोटाळा'! युरींचा घणाघात; कंपन्यांच्या प्रेमापोटी सरकार गप्‍प असल्याचा दावा

Cuncolim: कुंकळ्‍ळी मुख्‍याधिकाऱ्यांनी ‘प्रोटेक्‍शन मनी’ घेतले का? गोवा खंडपीठाचे चौकशीचे निर्देश; सर्व बांधकामे स्‍कॅनरखाली

Goa Assembly : 'गोरगरिबांना परवडणारी घरे देण्‍याची प्रक्रिया सुरू', CM सावंतांचे स्पष्टीकरण; 'लिलाव प्रक्रिया बंद करा', तुयेकरांची मागणी

Goa Assembly: घरे पाडण्‍याचा मुद्दा गाजला! बोरकर, सरदेसाई आक्रमक; CM सावंतांनी भाष्‍य करणे टाळले

Rashi Bhavishya 22 July 2025: मानसिक शांती लाभेल, कुठलाही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका; पाहा काय सांगतंय तुमच्या राशीचं भविष्य

SCROLL FOR NEXT