government job Dainik Gomantak
गोवा

Government Job: कम्प्युटर डिग्रीशिवाय सरकारी नोकरी मिळणार नाही! 1 नोव्हेंबरपासून राज्यात नवीन नियम लागू

Government Job Eligibility: शासकीय नोकरी मिळवण्यासाठी संगणकाचे ज्ञान आवश्यक असणार असून अशा सर्व पदांसाठी आता किमान सहा महिन्यांचा संगणक डिप्लोमा अनिवार्य करण्यात आला आहे

Akshata Chhatre

computer degree for government jobs: गोवा सरकारने शासकीय नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. आता शासकीय नोकरी मिळवण्यासाठी संगणकाचे ज्ञान आवश्यक असणार असून अशा सर्व पदांसाठी आता किमान सहा महिन्यांचा संगणक डिप्लोमा अनिवार्य करण्यात आला आहे. हा नियम येत्या १ नोव्हेंबरपासून राज्यात लागू होईल.

राज्याच्या कार्मिक विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार विविध शासकीय पदांच्या भरती नियमांमध्ये संगणकाचे ज्ञान, संगणक अभ्यासक्रम प्रमाणपत्र किंवा संगणक साक्षर असणे ही आवश्यक पात्रता म्हणून नमूद केली जाते. मात्र, आतापर्यंत वेगवेगळ्या सरकारी विभागांमध्ये उमेदवारांची संगणक साक्षरता तपासण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जात होत्या.

या प्रक्रियेला सुसूत्रता आणण्यासाठी संबंधित भरती नियमांमध्ये जिथे संगणकाचे ज्ञान किंवा तत्सम पात्रता आवश्यक असेल, तिथे इन्फो टेक कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेड (Info Tech Corporation of Goa Limited) द्वारे मान्यताप्राप्त माहिती तंत्रज्ञान ज्ञान केंद्र (Information Technology Knowledge Centre) किंवा संगणक संस्थेकडून, अथवा भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून, किंवा कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयाशी संलग्न असलेल्या मनुष्यबळ विकास संस्थेद्वारे (Human Resource Development Foundation) मान्यताप्राप्त किमान सहा महिन्यांचा संगणक डिप्लोमा प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.

ज्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ/राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांचे संगणक/संगणक विज्ञान/संगणक अनुप्रयोग/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयांतील पदवी/पदविका प्रमाणपत्र असेल

तसेच मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून (ITI) 'कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट' या ट्रेडमधील प्रमाणपत्र असेल, त्यांना हा सहा महिन्यांचा डिप्लोमा सादर करण्यापासून सूट देण्यात येईल.

या निर्णयामुळे शासकीय नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आता त्यांच्या संगणक ज्ञानाची अधिकृत आणि प्रमाणित माहिती सादर करावी लागणार लागेल आणि यामुळे भरती प्रक्रियेत एकसमानता आणि पारदर्शकता येईल. आता शासकीय नोकरी मिळवण्यासाठी केवळ पारंपरिक शिक्षण पुरेसे नसून, डिजिटल साक्षरता देखील महत्त्वाची ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT