
India Post Recruitment
पणजी: देशभरात टपाल खात्यातील ग्रामीण डाक सेवकांची २१ हजार ४१३ रिक्त पदे आहेत. त्यापैकी गोव्यात ७३ रिक्त पदे असून, त्या पदांची भरती सुरू झालेली आहे. केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री डॉ. प्रम्मासानी चंद्रशेखर यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. यासंबंधी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
चंद्रशेखर यांनी दिलेल्या उत्तरात पुढे म्हटले आहे, की गोव्यासाठी ग्रामीण डाक सेवकांची एकूण ४०७ पदे मंजूर झालेली आहेत. त्यापैकी उत्तर गोव्यात २३०, तर १७७ पदे दक्षिण गोव्यात आहेत. सध्या उत्तर गोव्यात ३५ आणि दक्षिणेत ३८ पदे रिक्त आहेत. ग्रामीण डाक सेवक जर ४५ दिवसांपेक्षा अधिक सुटीवर असेल तर त्याच्या जागेवर दुसरा डाकसेवक नेमावा लागतो. आवश्यक अटी पूर्ण केल्यानंतर बदली उमेदवार त्या पदावर काम करू शकतो.
त्याशिवाय दीर्घ सुटी घेऊन गेलेल्या ग्रामीण डाक सेवकांच्या जागेवर टपाल खात्यांत ३६ बदली उमेदवार काम करतात. ग्रामीण डाक सेवकांच्या भरती वेगवगेळ्या पद्धतीने केली जाते. केंद्र सरकारतर्फे २१ हजार ४१३ पदे ऑनलाईन पद्धतीने भरली जाणार असून, ती प्रक्रिया सुरू झाली आहे. संविधानाच्या कलम १६(२) अन्वये भाषिक भरती करताना नागरिकांमध्ये जात, धर्म, पंथ, लिंग व प्रदेश आदी मुद्यांवर भेदभाव करता येणार नाही, असे उत्तरात स्पष्ट केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.