Goa job vacancies Dainik Gomantak
गोवा

Government Job: नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर! दोन वर्षांत 5 हजार पदांची भरती होणार मुख्यमंत्री सावंत यांची घोषणा

Goa Government Job Openings: सध्या सरकारच्या एकूण ८३ खात्यांमध्ये ६,०६५ पदे रिक्त आहेत

Akshata Chhatre

पणजी: तुम्हाला जर का सरकारी खात्यात नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही माहिती सविस्तर वाचा. गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीतील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात येत्या दोन वर्षांत पाच हजार सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा केली होती. विधानसभेतून समोर आलेल्या लेखी उत्तरांमधून सध्या सरकारच्या एकूण ८३ खात्यांमध्ये ६,०६५ पदे रिक्त आहेत.

सरकारी खात्यांमध्ये किती पदे रिक्त आहेत?

सध्या गोवा सरकारच्या विविध खात्यांमध्ये नर्स, एलडीसी, शिपाई, पोलीस शिपाई, चालक, एमटीएस, शिक्षक अशी पदे रिक्त आहेत.

यांपैकी पोलीस खात्यामध्ये जवळपास की हजार पदे रिक्त आहेत, ज्यामध्ये पोलीस अधीक्षक, उपनिरीक्षक, शिपाई अशा पदांचा समावेश आहे. याशिवाय गोवा पोलीस खात्यात पोलीस शिपाईच्या पदासाठी ६५ पदं रिकामी आहेत. भरतीचे नियम अद्याप स्पष्ट नसल्याने या पदांवर अजून भरतीची प्रक्रिया अजून सुरु झालेली नाही.

आरोग्य खात्यात किती जागा उपलब्ध?

आरोग्य खाते, गोवा वैद्यकीय महाविद्याल, दंत महाविद्यालय आणि मानसिक चिकित्सा या विभागांमध्ये बऱ्याच जागा उपलब्ध आहेत.सगळ्या सगळे विभाग एकत्र केल्यास इथं ८०० पदं रिकामी आहेत आणि नर्ससाठी १६९ जागा बाकी आहेत. वॉर्ड सिस्टर, एलडीसी, यूडीसी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या जागांसाठी सुद्धा भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे.

शिक्षण खात्यात किती जागा बाकी?

सध्या गोव्यातील शिक्षण खात्यात ७५० हून जास्ती जागा बाकी आहेत. साहाय्यक शिक्षक, एडीईआय, मुख्याध्यापक, एलडीसी आणि प्राथमिक शाळांतील शिक्षक अशा वेगवेगळ्या पदांसाठी जागा रिकाम्या आहेत. याशिवाय वीज, सार्वजनिक बांधकाम आणि जलस्रोत खात्यांमध्ये देखील अभियंत्यांच्या जागा रिकाम्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT