CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

Goa Job: "प्रत्येक मतदारसंघात 300 नोकऱ्या...", गोव्यातील युवकांसाठी CM सावंतांची मोठी घोषणा

CM Pramod Sawant: गोवा मानव संसाधन महामंडळातर्फे आम्ही नोकऱ्या उपलब्ध करणार असून प्रत्येक मतदारसंघात ३०० नोकऱ्या देणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
Published on

पणजी : बऱ्याच जणांना नोकऱ्यांची चिंता असते, तशी चिंता आम्हालाही आहे. सरकारने ठरवले आहे, की पुढील दोन वर्षांच्या कार्यकाळात आम्ही नोकऱ्या देणार आहोत. कर्मचारी निवड आयोग तयार केला असला तरी आम्हाला कौशल्य प्राप्त केलेल्या मुलांची चिंता आहे.

त्यासाठी गोवा मानव संसाधन महामंडळातर्फे आम्ही नोकऱ्या उपलब्ध करणार असून प्रत्येक मतदारसंघात ३०० नोकऱ्या देणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. भाजपच्या पर्वरीतील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी पर्यटनमंत्री तथा आमदार रोहन खंवटे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, भाजपचे पर्वरी प्रभारी रूपेश कामत, उत्तर गोवा प्रभारी सिद्धार्थ कुंकळयेकर, भाजप पर्वरी मंडळ अध्यक्ष विनीत परब, उत्तर गोवा अध्यक्ष दयानंद कारबोटकर, मतदारसंघातील सरपंच, पंच आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

CM Pramod Sawant
Goa Education: "पावसाळ्यापूर्वी सर्व शाळा सुविधांनी सुसज्ज करा", मुख्यमंत्री CM सावंतांची सूचना

यावेळी मुख्यमंत्री सावंत म्हणाले, की आम्ही तात्पुरते राजकारण करण्यासाठी आलेलो नाही. राजकारण हा आमचा व्यवसाय नाही. आम्ही हे समाजकारणासाठी करतो. लोक आमच्यासाठी प्रथम आहेत. म्हणून आम्ही अंत्योदय, ग्रामोदय आणि सर्वोदय या तत्त्वांवर काम करतो. हे काम करण्यासाठी भाजप पक्ष आणि सरकार आहे.

मंत्री खंवटे यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

या मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्री खंवटे यांचे कौतुक केले. खंवटे यांनी पर्वरी मतदारसंघात विकास करताना पर्यटन खात्यात देखील चांगली प्रगती साधली आहे, असे ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी युनिटी मॉल, टाईम स्क्वेअर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संग्रहालयाचा उल्लेख केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com