Government Jobs Dainik Gomantak
गोवा

Government Jobs: सरकारी नोकरीची मोठी संधी; कर्मचारी भरती आयोगाकडून 215 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

Staff Selection Commission 215 Posts: राज्य कर्मचारी भरती आयोगाकडून आणखी २१५ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्य कर्मचारी भरती आयोगाकडून आणखी २१५ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात सर्वात जास्त ‘एलडीसी’च्या १९७ जागा आहेत. या सर्व पदांसाठी उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन अर्जच स्वीकारले जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

उर्वरित रिक्त जागा ज्या भरल्या जाणार आहेत, त्यात ज्युनिअर असिस्टंटच्या १३, डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटरच्या ३, तर डेटा एन्ट्री ऑपरेटरच्या २ जागांचा समावेश आहे. ऑनलाइन अर्जांसाठी २ ऑक्टोबरची मुदत आयोगाने ठेवली आहे. सरकारच्या विविध सरकारी विभागांमधील ‘गट-क’ पदांसाठी ही जाहिरात काढण्यात आली आहे. परीक्षेची तारीख आयोगाचे संकेतस्थळ आणि वर्तमानपत्रात जाहिरातीद्वारे कळविली जाईल, असे आयोगाने नमूद केले आहे.

लिपिकाच्या सर्वाधिक १९७ जागा

लिपिकाच्या १९७ पदांचा विचार केला, तर त्यात खुल्या जागा १०९, ‘एसटी’साठी २५, ‘एससी’करिता ४, ‘ओबीसीं’साठी ४४, आर्थिक दुर्बल घटकांसाठी १५ जागा ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय यामध्ये २३ पदे ‘बेंचमार्क अपंगत्व’ असलेल्या व्यक्तींसाठी, १७ पदे माजी सैनिकांसाठी आणि १ पद गुणवंत खेळाडूंसाठी राखीव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT