Government to increase the number Covid - 19 tests 
गोवा

लवकरच प्रतिदिन अडीच हजार कोविड चाचण्‍या होणार

गोमंतक वृत्तसंस्था

पणजी: राज्यात काही दिवसांपासून चाचण्यांचे प्रमाण कमी झाले होते, परंतु आता प्रति दिन दोन हजार ते अडीच हजारांपर्यंत चाचण्या केल्या जातील. लोकच चाचण्यांसाठी पुढे येत नाहीत, असे चित्र आहे. अनेकांना आपल्या घराच्या दारावर आयसोलेशनचे स्टिकर लावलेले नको वाटते, असे सांगत आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी राज्य सरकारकडून जाणीवपूर्वक चाचण्या कमी केल्याचे खंडन केले. याप्रसंगी आरोग्य खात्याचे सचिव अमित सतेजा, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता शिवानंद बांदेकर, डॉ. डिसा यांची उपस्थिती होती. 


कोरोनाविषयी नेमलेल्या तज्‍ज्ञ समितीची आज बैठक झाली. त्या बैठकीनंतर मंत्री राणे यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील कोरोनास्थितीचा आढावा विषद केला. ते म्हणाले की, गोव्यात घरगुती विलगीकरणात जे उपचार घेत आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी वैद्यकीय शाखेत तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनींचा लक्ष ठेवण्यासाठी उपयोग केला जाणार आहे. परंतु दुसरी एक गोष्ट पुढे आली असून, कोरोना उपचारानंतर आरोग्य बिघाडल्याने ६० जण पुन्हा उपाचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात वेगळा कक्ष सुरू करण्यात आला आहे. डॉ. लवंदे यांच्या देखरेखीखाली हा कक्ष कार्यरत आहे.
 

प्‍लाझ्‍मा थेरपी उपचार सुरुच ठेवणार
राज्यात मागील काही दिवसांत कोरोनाच्या चाचण्यांचा आकडा फारच कमी झाल्याचे दिसून आले. आता आम्ही तो आकडा दोन ते अडीच हजारापर्यंत नेणार आहोत. मुख्यमंत्र्यांकडे याविषयी चर्चा झाली आहे. त्याशिवाय मोठमोठ्या कंपन्यांच्या चाचण्या आम्ही करू शकत नाही, त्यांनी खासगी लॅबमध्ये चाचण्या करून घेणे आवश्‍यक आहे. अनेकजण कोरोनाच्या चाचण्यांसाठी पुढे येत नाहीत, त्या लोकांना आपल्या घराच्या दारावर घरगुती विलगीकरणाचे स्टिकर लावायला नको वाटते. प्लाझ्मा थेरपी आम्ही बंद करणार नाही, कारण ७० टक्के रुग्णांवर त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. त्यामुळे प्लाझ्माचा उपयोग आम्ही चालूच ठेवणार 
आहोत.

जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी

नेरुल येथे एका चित्रपटाचे चित्रिकरण सुरू आहे. त्या ठिकाणच्या लोकांनी वापरलेले पीपीपी किट कोठेही फेकून दिले जातात. त्यावर आरोग्य खाते काय कारवाई करणार का, असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला तेव्हा मंत्री राणे म्हणाले की, कारवाईचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात आहे. त्यांनी संबंधित पंचायतीला आदेश द्यायला हवेत. आम्ही फक्त पंचायत क्षेत्रातील वैद्यकीय आणि कोरोनाशी संबंधित कचरा विघटनासाठी गोमेकॉत आणतो. तसे जर अशाप्रकारे पीपीपी किट इतरत्र टाकले जात असतील, तर आपण जिल्हाधिकाऱ्यांशी बोलू, असेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT