Goa Bhavan Ayodhya Dainik Gomantak
गोवा

Goa Bhavan Ayodhya: श्री रामलल्लाच्या अयोध्यानगरीत उभे राहणार 'गोवा भवन'! सरकारकडून गतिमान हालचाली; भूखंड निश्चित

Goa Bhavan land allocation: अयोध्या येथे श्री रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या गोमंतकीयांची सोय व्हावी, यासाठी अयोध्येत गोवा भवन उभारण्याच्या हालचालींना सरकारने गती दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Bhavan construction in Ayodhya

पणजी: अयोध्या येथे श्री रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या गोमंतकीयांची सोय व्हावी, यासाठी अयोध्येत गोवा भवन उभारण्याच्या हालचालींना सरकारने गती दिली आहे. राज्य सरकारने तेथे अधिकाऱ्यांचे एक पथक पाठवून मंदिरापासून विमानतळाच्या दिशेने ५ किलोमीटर अंतरावर ३ हजार चौरस मीटर आकाराचा भूखंड निश्चित केला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अयोध्या दौऱ्यावेळी भूखंड उपलब्ध झाल्यास गोवा भवन उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश विकास निगमच्या माध्यमातून तेथील सरकारने एक भूखंड गोवा सरकारला देण्याची तयारी दर्शविली.

राज्य सरकारने सहा अधिकाऱ्यांचे पथक यासाठी याच आठवड्यात अयोध्येला पाठवले होते. त्या पथकात सर्वसाधारण प्रशासनाचे अवर सचिव, सार्वजनिक बांधकाम खात्यातील वास्तुविशारद, भू नोंदणी अधिकारी, बांधकाम अभियंता आणि मुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिकाऱ्याचा समावेश होता.

उत्तर प्रदेश सरकारने देऊ केलेला भूखंड गोवा भवन उभारण्यासाठी योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी हे पथक पाठविले होते. पथकाने या भूखंडावर गोवा भवन उभारता येईल, असा अभिप्राय सरकारला दिला असल्याची माहिती मिळाली आहे.

या भूखंडात उंच-सखलपणा नसून तो रस्त्यालगतच असल्याने तेथे पोचणेही सोपे होणार असल्याचे यासंदर्भातील अहवालात नमूद केले आहे. त्या ठिकाणी तळमजल्यावर ९० आणि पहिल्या मजल्यावर १०० खोल्या बांधता येतील, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT