Goan Food Recipe Dainik Gomantak
गोवा

Goan Food Recipe: सुंगटं घातलेल्या भाजीसाठी प्रसिद्ध गोपिका...

Goan Food Recipe: काय वेगळं आहे या भाजीत? तर या भाजीत अनेक जिन्नस असे आहेत जे बाकी कुठल्याच रेस्टोरंटमधल्या भाजीत दिसणार नाहीत. इथे मिळणाऱ्या भाजीत अळसांदे आहेत, त्यात सुंगटं देखील आहेत. पण यात मुळा आणि सुंगटे घालतात.

Manaswini Prabhune-Nayak

Goan Food Recipe: भाजीपाव मधल्या भाजीची वेगवेगळी चव मी शोधत असते. भाजी बनवायची वेगळी पद्धत, वेगळा मसाला दिसला तर त्याची नोंद ठेवते. खूप दिवसांपासून मी घरातच एका रेस्टोरंटबद्दल ऐकत होते. पण तिथं जाण्याचं जमून येत नव्हतं. नुवे - मडगाव रस्त्यावर 'गोपिका' नावाचं साधसं रेस्टॉरंट आहे.

'गोपिका' साधंसं असलं तरी तिथली चव साधीशी नाही तर ती अफलातून आहे. माझे दीर शाम नायक यांच्याकडून ‘गोपिका' रेस्टॉरंटचं खूपच कौतुक ऐकलं होतं. विशेष करून तिथल्या 'सुंगटा भाजी'बद्दल त्यांच्याकडून खूप ऐकलं होतं. हे कौतुक ऐकताना 'एवढे काय विशेष आहे या भाजीमधे!' असं मला वाटायचं.

एकदा त्या रस्याने जाताना मुद्दाम तिथली भाजी खाण्यासाठी थांबले. रेस्टॉरन्टच्या गल्ल्यावर एक महिला दिसली, सर्वात पहिली सुंगटा घातलेली भाजी आणि उंडे आणायला सांगितले. भाजी समोर येताच ती भाजी मी बघत राहिले, कारण अशी भाजी मी पूर्ण गोव्यात कुठेच बघितली नव्हती.

तर या भाजीत अनेक जिन्नस असे आहेत जे बाकी कुठल्याच रेस्टोरंटमधल्या भाजीत दिसणार नाहीत. इथे मिळणाऱ्या भाजीत अळसांदे आहेत, त्यात सुंगटंदेखील आहेत. पण यात मुळा आणि सुंगटे घालतात. या सगळ्यामुळे इथल्या भाजीची चव खूपच वेगळी लागली. सुंगटं, मुळा आणि थोडे अळसांदे यांची एकत्रित चव किती चविष्ट असू शकते याचं उदाहरण या भाजीच्या रूपानं माझ्यासमोर होतं.

खरंच या भाजीचं जेवढं कौतुक ऐकलं होतं त्याहूनही याची चव अधिक उत्तम आहे. ही भाजी खायला आपण एवढा उशीर का केला? हे इथं गेल्यावर जाणवलं. अळसांदेची भाजी खूप वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये आजवर अनेकदा खाल्ली आहे. पण इथली भाजी या सर्व भाजींपेक्षा फार फार वेगळी वाटली. मी अळसांदेचं सुंगटं घालून तोणाक बनवते पण ती यापेक्षा खूप वेगळी असते. त्यात खोबरं, कांदा, लसूण आणि सांबर मसाला यांचं वाटण असतं. यामुळे याला छान चव येते.

गोपिकामध्ये मिळणारी अळसांदे भाजीमध्ये फक्त सुगंटं नाहीतर यात मुळ्याच्या स्लाईस घालतात. या भाजीतला ''चेंजमेकर'' घटक हा मुळा आहे. मुळ्यामुळे या भाजीला वेगळेपण मिळालंय. मुळा घातलेली अळसांदेची भाजी तुम्ही देखील कधी खाल्ली नसणार. इथल्या घराघरात अळसांदे भाजी/तेणाक बनवण्याची ठराविक प्रचलित पध्दत आहे आणि यात मुळ्याला अजिबात स्थान नाही.

अजून वेगळ्या भाज्या आहेत ज्यामध्ये मुळा घातला जातो. ‘गोपिका’मध्ये गेले असता या हॉटेलच्या सर्वेसर्वा शीतल काशिनाथ नाईक भेटल्या. त्या स्वतः ही भाजी बनवतात. भाजीचं वेगळेपण डोळ्यांना दिसतं, जिभेला जाणवतं. तरी शीतल नाईक यांना भाजीबद्दल विचारलं तर ''यात माझं कौशल्य काही नाही.

अळसांदे, सुंगटं, मुळा या तिघांची संगती आणि यात घातला जाणारा मसाला याची सगळी जादू आहे.'' असं मोकळेपणानं बोलून गेल्या. सुंगटं घातलेली ही भाजी खाण्यासाठी इथं मुद्दाम येणारे अनेकजण आहेत. याशिवाय इथं सुकी भाजी, उसळ, मिरची भजी, दुपारी फिशकरी राईस थाळी मिळते. इथं जाऊन तुम्ही बाकीचं काही खाल्लं नाही तरी इथली सुंगटं घातलेली भाजी आवर्जून खाऊन बघा. एका वेगळ्या चवीचा तुम्हाला अनुभव मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT