PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 6 फेब्रुवारी रोजी गोव्यात आगमन होत आहे. प्रथम ते बेतुल येथील ओएनजीसीच्या भारत सौरऊर्जा सप्ताहाचे उद्घाटन करतील व नंतर मडगावात कदंब बस स्थानकावर उभारलेल्या मंडपात विविध प्रकल्पांचे वर्च्युअली उद्घाटन व पायाभरणी करणार असून नंतर कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
मडगावमधील कार्यक्रम दुपारी 1 ते 2 च्या सुमारास सुरू होईल, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे पक्षाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधानांच्या हस्ते कुंकळ्ळी येथील एनआयआटी, करंझाळे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्टस व कुडचडे येथील कचरा व्यवस्थापन प्लांटचे उद्घाटन होईल. त्याच बरोबर शेळपे, साळावली येथील जल प्रक्रिया प्लांटची व कांपाल पणजी ते रेईश मागुस दरम्यानच्या ‘रोप वे’ची पायाभरणी केली जाईल, अशी माहिती तानावडे यांनी दिली.
गोव्यातील सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला व सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन तानावडे यांनी केले आहे. कदंब बस स्थानकावर जे प्रदर्शन भरणार आहे, त्याची संकल्पना ‘विकसीत भारत, विकसीत गोवा’ ही आहे, असे त्यांनी सांगितले. अयोध्येतील रामलल्लाच्या प्रतिष्ठापने नंतर पंतप्रधान प्रथमच गोव्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
राज्य सरकार कसे काम करते व गोव्याची आर्थिक बाजू कशी बळकट करू पहाते, गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पडणे, जी-२० सारख्या आंतरराष्ट्रीय बैठकांचे आयोजन करण्याची संधी गोव्याला मिळणे ही अभिमानाची गोष्ट असल्याचेही राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात उल्लेख केल्याचे सावईकर यांनी सांगितले.
अडवाणी यांचे अभिनंदन
भारतीय जनता पक्ष गोवातर्फे ‘भारत रत्न’ या सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानासाठी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचे अभिनंदन करीत असल्याचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडवाणी यांची या सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले. त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर होणे, ही अत्यंत आनंददायी घटना आहे. त्यांना जवळून भेटण्याचा अनेक वेळा योग आला व त्यांचे मार्गदर्शनही लाभले असे दामू नाईक यांनी म्हटले आहे.
राज्यपालांचे कौतुक
शुक्रवारपासून गोवा विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले असून पहिल्याच दिवशी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचे भाषण झाले. या भाषणात त्यांनी राज्य सरकारने जी विकास कामे केली आहेत.
समाजातील सर्व घटकापर्यंत सरकारच्या योजना पोहोचविल्या आहेत, त्याचा उल्लेख राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात केला आहे. एकंदर राज्य सरकारच्या कामाचा आलेख त्यांनी योग्य प्रकारे जनतेसमोर ठेवलेला आहे, त्यासाठी भारतीय जनता पक्ष राज्यपालांचे अभिनंदन करीत असल्याचे प्रदेश सरचिटणीस अॅड. नरेंद्र सावईकर यांनी पत्रकारांना सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.