Somnath Komarpant while receiving the award.

Award 

 

Dainik Gomantak 

गोवा

प्राचार्य गोपाळराव मयेकर स्मृती पुरस्कार डॉ. सोमनाथ कोमरपंत यांना प्रदान

परेश प्रभू यानी डॉ. कोमरपंत यांच्या योगदानाबद्दलची माहिती प्रस्तुत केली.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: जे सामन्यांना दिसत नाही ते साहित्यिकांना दिसते. ते सत्याचा नितीचा विचार व सदाचाराचा मार्ग दाखवू शकतात. सद्या मानवजात्य अनेक विशख्यांमध्ये सापडली आहे. कोविड महामारी आहेच. शिवाय भोग लालसा, बेकायदेशीरपणाचा कळस चढलेला आहे. तंत्रज्ञानाचा अतोनात वापर होत आहे व हे सर्व मानवजातीसाठी बाधक आहे. माणसाचा यंत्रमानव होताना दिसत आहे. अशावेळी साहित्यिक, विचारवंत, तत्ववेश्ठे यानी सौदार्याचा, सलोख्याचा, विवेकाचा, नितिमत्तेचा उदघोष करावा असे आवाहन प्राचार्य माधवराव कामत यानी आज केले.

गोवा (Goa) मराठी अकादमीतर्फे मडगावी गोमन्त विद्यानिकेतनच्या ग्रंथालयात डॉ. सोमनाथ कोमरपंत यांना प्राचार्य गोपाळराव मयेकर स्मृती पुरस्कार (Award) त्यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत, नवप्रभाचे संपादक परेश प्रभू, गोमन्त विद्या निकेतनचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर हे मान्यवर उपस्थित होते.

कोमरपंत यांचे मराठी भाषा, साहित्य, संस्कृती (Culture), समीक्षण या क्षेत्रांमधील त्यांचे कार्य अतुलनीय असेच आहे असे ते म्हणाले. साहित्यिकाचा सत्कार करणे म्हणजे समाजाला त्यांच्याबद्दल असलेले प्रेम, आदर व्यक्त करणे हे आहे असेही प्राचार्य कामत म्हणाले.

परेश प्रभू यानी डॉ. कोमरपंत यांच्या योगदानाबद्दलची माहिती प्रस्तुत केली. कोमरपंत हे सज्जनत्वाचे मुर्तीमंत व्यक्तिमत्व असल्याचे त्यानी सांगितले. डॉ. कोमरपंत याना हा पुरस्कार प्रदान करुन या पुरस्काराची उंची वाढलेली आहे. ते उत्तम शिक्षक होते. त्यानी कृतितून, वर्तनातुन विद्यार्थ्यांना सदाचाराचा मार्ग दाखविला. त्यांचे जीवन आनंदयात्री सारखे आहे. कविता हा त्यांचा स्वास आहे. ते आपल्या समिक्षेद्वारे लेखकांना उत्तेजन देण्याचे व मार्गदर्शन करण्याचे कार्य करतात असेही प्रभू म्हणाले.

अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत यांनी या पुरस्काराबद्दलची पार्श्र्वभुमी सांगितली. गोव्याच्या स्वातंत्र्यानंतर प्राचार्य गोपाळराव मयेकर यानी शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रांमध्ये गोमंतकीयांना दिशा दाखवली. व त्यांची परंपरा डॉ. सोमनाथ कोमरपंत पुढे नेत आहेत असे सामंत यानी सांगितले. मयेकर व कोमरपंत यांच्यामध्ये अनेक प्रकारात साम्य, धागे व बिंदू दिसुन येतात. दोघांनी लोकशिक्षकांची भुमिका बजावली. दोघांनीही वाणी, लेखणी, साहित्याद्वारे गोमंतकाच्या अंतरंगातील दिव्यत्वच सादर करण्याचा प्रयत्न केला. गोव्यातील मरगळ दूर होण्यासाठी या दोघांच्याही साहित्याचा अभ्यास व्हावा असे सामंत यानी सांगितले.

सत्कारमुर्ती डॉ. सोमनाथ कोमरपंत यानी आपल्या भाषणातुन पुर्वीच्या काही आठवणी जागृत केल्या व आपले मनोगत व्यक्त केले. आपली व प्राचार्य मयेकर यांची तुलना होऊच शकत नाही. ते शिखरावर होते तर आपण अजुनही पायथ्याशीच आहे असे डॉ. कोमरपंत यानी सांगितले. माझ्या विद्यार्थीदशेपासुन घडण्यामध्ये ज्या ज्या गुरूवर्ययांचे आपल्याला मार्गदर्शन मिळाले त्यातील प्राचार्य मयेकर एक होते असेही डॉ. कोमरपंत यानी सांगितले. त्याचे संपुर्ण जीवन हे उघड्या ग्रंथासारखे आहे. गोवा मुक्तीसंग्रामाला (Goa Liberation Struggle) त्यानी चालना मिळवून दिली. प्रत्येक क्षेत्रांमध्ये त्यानी तेजस्वी मुद्रा सांभाळली. ते पंडितही होते व क्रियावानही होते असेही डॉ. कोमरपंत म्हणाले.

गोमन्त विद्या निकेतनचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर यानी सर्वांचे स्वागत केले. शिवाय संपुर्ण कार्यक्रमाचे त्यानी सुत्रसंचलन केले व शेवटी आभारही व्यक्त करताना पसायदानाने सोहळ्याची सांगता केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT