पणजी: गुगल मॅपची मदत घेऊन गोव्यातून चेन्नईला निघालेला ट्रक रेल्वे ब्रिजखाली अडकून पडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यापूर्वी देखील गुगल मॅपमुळे रस्ता चुकल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातून एक मालवाहू ट्रक चेन्नईच्या दिशेने निघाला होता. चालकाने रस्ता समजण्यासाठी गुगल मॅपची मदत घेतली. दरम्यान, गुगलने चेन्नईला जाण्यासाठी ट्रक चालकाला शॉर्टकट मार्ग सुचवला. चालक या मार्गावरुन ट्रक घेऊन जात असताना लोंढा येथे रेल्वेच्या अंडरब्रिजखाली ट्रक अडकून पडला. पुढे मार्ग नसल्याने चालकाला ट्रक त्याच जागी उभा करावा लागला.
यापूर्वी देखील उघडकीस आलेत असे प्रकार
गुगल मॅपची मदत घेऊन गोव्यात येत असलेली बिहारची फॅमिली कर्नाटकच्या जंगलात रात्रभर अडकून पडली होती. गोव्याला येण्यासाठी त्यांनी गुगल मॅपची मदत घेतली. चालकाने मॅपने दाखवलेलारस्ता फॉलो केला पण, पुढे कार भीमगड वन्यजीव अभयारण्यात अडकून पडली. अखेर बेळगाव पोलिसांच्या मदतीने त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. दरम्यान, रात्रभर त्यांना जंगलातच काढावी लागली.
पुण्यातील पर्यटक कळंगुटमध्ये चुकला
पुण्यातून गोव्यात पर्यटनासाठी आलेला एक पर्यटक चारचाकी घेऊन कळंगुट येथे जात असताना त्याचा देखील रस्ता गुगलमुळे चुकल्याचे उघडकीस आले होते. या पर्यटकाला बीचवर जाण्याचा रस्ता चुकल्याने त्याची कार रेतीत अडकून पडली होती.
टोलटो-सांतइस्तेव्ह फेरीधक्का येथे झालेल्या अपघातात देखील गुगल मॅपमुळे कार चालक रस्ता चुकल्याचा दावा करण्यात आला आहे. या अपघातात युवती सुखरुप बचावली असून, यातील युवक बशुदेव भंडारी (भरुच-गुजरात) अद्याप बेपत्ताच आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.