Goa Politics: 'तो' मंत्री कोण? कर्नाटक खाण घोटाळ्यात गोवा सरकारमधील BJP मंत्र्यावर आरोप; चोडणकरांच्या दाव्याने खळबळ

Karnataka Mining Scam: कर्नाटकमध्ये काही वर्षापूर्वी ३५,००० कोटी रुपयांचा खाण घोटाळा उघडकीस आला होता.
Girish Chodankar On Karnataka Mining Scam
Congress Leader Girish ChodankarDainik Gomantak
Published on
Updated on

Karnataka Mining Scam

पणजी: 'कर्नाटकातील ता. १३ सर्वांत मोठ्या खाण घोटाळ्यात गोव्यातील भाजप सरकारमधील एका प्रमुख मंत्र्यावर गंभीर आरोप आहेत. हा खटला २०१५ पासून न्यायालयात सुरू आहे आणि २४ फेब्रुवारी रोजी अंतिम निकाल शक्य आहे. दोषी आढळल्यास संबंधित मंत्र्याला सात वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो', अशी खळबळजनक माहिती काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी 'एक्स'वर टाकली आहे.

'एक्स'वर माहिती देताना 'तो मंत्री कोण?' अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. चोडणकर यांनी म्हटले आहे- 'संबंधित मंत्र्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. कर्नाटक लोकायुक्तांच्या 'एसआयटी'ने त्या संदर्भात आरोपपत्र दाखल केले होते. त्यावर येत्या २४ फेब्रुवारीला निवाडा आहे'. दरम्यान, चोडणकर यांनी यापूर्वीही काही खळबळजनक दावे केले होते.

Girish Chodankar On Karnataka Mining Scam
Goa Police: दादागिरी करणाऱ्या कॉन्स्टेबलची बदली; 2 पोलिस स्थानकात फटाके वाजवून आनंदोत्सव, गोव्यात नेमकं काय घडलं?

Karnataka mining scam

कर्नाटकमध्ये काही वर्षापूर्वी ३५,००० कोटी रुपयांचा खाण घोटाळा उघडकीस आला होता. या प्रकरणात भाजपच्या राज्यमंत्री गली जनार्धन रेड्डी यांचे नाव समोर आले होते. या घोटाळ्यात तत्कालिन मुख्यमंत्री बी. एस येडीयुरप्पा यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

शिवाय त्यांना बंगळुरु तुरुंगात तीन आठवडे कारावास भोगावा लागला होता. दरम्यान, गोव्यातील भाजपचा एक मंत्र्याचा देखील यात सहभाग असल्याचा आरोप चोडणकरांनी केल्याने तो मंत्री कोण? अशी चर्चा सुरु झालीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com