Konkan Railway Special Train Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway Special Train: गोवा, कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी खूशखबर! कोकण रेल्वे सोडणार विशेष रेल्वेगाड्या; वेळापत्रक, थांबे, बुकिंगची माहिती जाणून घ्या

Konkan Railway: ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही गोव्याचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वेगाड्या चालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Manish Jadhav

ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही गोव्याचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वेगाड्या चालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार या विशेष रेल्वे गाड्यांना वीर, वैभववाडी रोड, सावंतवाडी रोड या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला.

तीन विशेष गाड्या

दरम्यान, ख्रिसमस आणि हिवाळी पर्यटनासाठी गोव्यासह (Goa) कोकणाकडे पर्यटकांचा वाढता कल लक्षात घेत या तीन विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला. यामध्ये गाडी क्रमांक 01151/01152 सीएसएमटी-करमळी, 01463/01464 एलटीटी-कोचुवेली आणि 01407/01408 पुणे-करमळी चालवण्याचे नियोजन केले आहे. ख्रिसमस आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक गोव्यात येतात. हेच लक्षात घेवून रेल्वेनेही तसे नियोजन केले आहे.

पर्यटकांचा ओघ

मागील काही वर्षांमध्ये गोव्यासह कोकणाकडे पर्यटकांचा (Tourists) ओढा वाढला आहे. ख्रिसमसच्या काळात शाळांना सुट्ट्या असल्याने मुंबईसह पुण्यातील हौशी पर्यटकप्रेमी कोकण, गोव्याची वाट धरतात. त्यामुळे रेल्वेगाड्यांचे रिझर्वेशन मिळणे बंद होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वेळापत्रक

गाडी क्र. 01152 करमळी ते मुंबई सीएसएमटी स्पेशल (दैनिक) गाडी करमळी येथून 20 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत दररोज 14.14 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 03.45 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिवी स्थानकावर थांबा.

गाडी क्र. 014463 लोकमान्य टिळक (टी) ते कोचुवेली स्पेशल (साप्ताहिक) ही गाडी- लोकमान्य टिळक येथून दर गुरुवारी म्हणजे 19 डिसेंबर, 26 डिसेंबर, 2 जानेवारी आणि 9 जानेवारी रोजी 16:00 वाजता सुटणार. दुसऱ्या दिवशी 22.45 वाजता कोचुवेलीला पोहोचणार.

तर कोचुवेलीवरुन ही गाडी दर शनिवारी म्हणजेच 21 डिसेंबर, 29 डिसेंबर, 4 व 11 जानेवारी रोजी 16.20 वा. सुटणार आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक (टी) येथे 00.45 वाजता पोहोचणार.

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बायंडूर (एच), कुंदापुरा, उडुपी, सुरथकल, मंगळुरु जं., कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर जं., त्रिशूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम आणि कोल्लम जंक्शन स्टेशनवर थांबणार.

गाडी क्र. 01407 पुणे- करमळी- दर बुधवारी 25 डिसेंबर,1 जानेवारी, 8 जानेवारी 05.10 वाजता सुटणार- त्याच दिवशी 20.25 वाजता करमळीला पोहोचणार.

करमळीहून-पुणे: दर बुधवारी 25 डिसेंबर, 1 जानेवारी, 8 जानेवारी 22.00 सुटणार- दुसऱ्या दिवशी 13.00 वाजता सुटणार.

थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी स्थानकावर थांबणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

Crime News: देवगड- फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला मृतदेह, घात की अपघात?

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

SCROLL FOR NEXT