Babush Monserrate  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील कामगारांना खुशखबर: रोजंदारी वाढणार

सर्वांची नोंदणी होणार: मंत्री बाबूश मोन्सेरात यांची माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील कामगारांच्या रोजंदारीचा दर हा 6 वर्षांपूर्वीचा आहे. यासाठी राज्याच्या कामगार मंत्रालयाने रोजंदारीचा दर वाढविण्याचा निर्णय घेतला असून इतर राज्यांतील रोजंदारी दरांची माहिती घेतली आहे. केरळ आणि दिल्लीच्या धर्तीवर राज्यातील कामगारांची रोजंदारी वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती कामगार नेते बाबूश मोन्सेरात यांनी आज दिली. कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांसाठी ही खुशखबर मानावी लागेल. कामगार संघटनांनीही सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

यावेळी मंत्री मोन्सेरात म्हणाले, आज कामगार मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. कामगार बोर्ड तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत झाला. राज्य सरकार हे कामगारांच्या बाजूने असून त्यांच्या कल्याणासाठी असलेल्या 17 योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी सरकारचे प्रयत्न असून राज्यातील विविध कंपन्यांकडे किती कामगार काम करतात, याची माहिती मागवली आहे. ज्या कंपन्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करतात, त्याची माहितीही कंपन्यांनी कामगार आयुक्तांना द्यावी. त्यामुळे राज्यातील तरुणांना रोजगारांची संधी कुठे आहे याची माहिती मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT