Gomantk Marathi Sahitya Parishad Dainik Gomantak
गोवा

Goa News: मराठी भाषेला राजभाषा करा! साहित्य परिषदेच्या अध्यक्षांचे प्रतिपादन; सत्तरीत सन्मान सोहळा

Gomantk Marathi Sahitya Parishad: मराठीची चळवळ पुढे न्यायची असून मराठीला राजभाषा करणे हे राज्य सरकारचे आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन साहित्यिक आणि गोमंतक मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप केळकर यांनी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन केंद्र सरकारने उत्तम कार्य केले आहे. आणि म्हणूनच आज मराठीसाठी ज्यांनी योगदान दिले त्यांचा आम्ही सन्मान सोहळा आयोजित केला आहे. आता मराठीची चळवळ पुढे न्यायची असून मराठीला राजभाषा करणे हे राज्य सरकारचे आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन साहित्यिक आणि गोमंतक मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप केळकर यांनी केले.

ब्रह्मकरमळी-सत्तरी येथील श्री ब्रह्मदेव देवस्थान सभागृहात ब्रह्मदेव युवक संघ आणि गोमंतक मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळल्याचे औचित्य साधून आयोजित मराठीसाठी योगदान देणाऱ्यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी माजी उपसभापती नरहरी हळदणकर, ब्रह्मदेव युवक संघ ब्रह्माकरमळीचे अध्यक्ष प्रसाद खाडिलकर, पंचायत सदस्य संध्या खाडिलकर, सखाराम देसाई, वामनराव देसाई, मिलिंद गाडगीळ, ॲड शिवाजी देसाई, विश्वनाथ पिंगुळकर, संजीव बर्वे, प्राजक्ता गावकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात ॲड. शिवाजी देसाई, विश्वनाथ पिंगुळकर, संजीव बर्वे, वामनराव देसाई, प्राजक्ता गावकर,श्री शांतादुर्गा दांडिया ग्रुप ब्रह्मकरमळीच्या वतीने कु. दिप्ती धुरी आदींचा माजी उपसभापती नरहरी हळदणकर आणि संदीप केळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. नरहरी हळदणकर म्हणाले की, अभिजात भाषा मराठी झाल्याने मराठीप्रेमींत चैतन्य पसरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT