Gomantak's Editor-in-Chief Raju Nayak Felicitation Dainik Gomantak
गोवा

गोवा घटक राज्य दिनानिमित्त 'गोमन्तक'चा राज्य पातळीवर सन्मान

गोमन्तकचे संपादक संचालक राजू नायक यांनी हा सन्मान स्वीकारला.

दैनिक गोमन्तक

पोर्तुगीजांच्या राजवटीविरुद्ध गोवेकरांनी आपला लढा दिल्यावर गोव्याची पारतंत्र्यातून सुटका झाली. गोवा मुक्‍तीच्‍या 25 वर्षांनंतर 1987 मध्ये दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्‍या काळात गोव्‍याला घटक राज्‍याचा दर्जा मिळाला. त्‍यानंतर राज्‍याला खऱ्या अर्थाने स्‍वायत्तता लाभली. निर्णय घेण्याचे स्‍वातंत्र्य मिळाले. विधानसभा अस्‍तित्‍वात येऊन आमदारांची संख्या वाढली. तसेच एक राज्‍यसभा खासदारपदासह दोन लोकसभा खासदार लाभले. गेल्‍या 35 वर्षांत गोव्‍याचा अनेक अंगांनी विकास झाला.

गोवा मुक्तीनंतर 'गोमन्तक' हे पहिले वृत्तमाध्यम गोव्यात उभे राहिले. गोमन्तकने आजवर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करत मोलाचे योगदान दिले आहे. परखड आणि स्पष्ट पत्रकारीतेच्या माध्यमातून गोव्यातील जनसामन्यांच्या समस्या मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यात मदत केली आहे.

याच योगदानाबद्दल गोवा घटक राज्य दिनानिमित्त राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात गोमन्तक समूहाचा सत्कार करण्यात आला. गोमन्तकचे संपादक संचालक राजू नायक यांनी हा सन्मान स्वीकारला.

केंद्रिय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याहस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी सोबतच राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, मच्छीमार मंत्री निळकंठ हळर्णकर, कृषीमंत्री रवी नाईक, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, व समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई इ. मंत्री उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Labh Drishti Yog 2026: शुक्र-शनीचा 'लाभ दृष्टी योग'! 15 जानेवारीपासून पालटणार 'या' 5 राशींचे नशीब; धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे संकेत

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाच्या पराभवाचा खरा विलन कोण? कर्णधार आयुष म्हात्रेची 'ती' चूक भारताला पडली महागात!

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाचे स्वप्न भंगले! पाकिस्ताने भारताला 191 धावांनी नमवत उंचावला विजयाचा 'चषक' VIDEO

VIDEO: बापरे! ट्रकखाली जाता जाता वाचला... तरुणांचा जीवघेणा थरार व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ओढले ताशेरे

'पर्यटनाला ओव्हर-रेग्युलेशनचा फटका!' फुकेटच्या तुलनेत गोव्यातील हॉटेल्स दुप्पट महाग; अमिताभ कांतांचे Tweet Viral

SCROLL FOR NEXT