मोरजी : मोपा विमानतळ बांधणारी जीएमआर कंपनी आणि सरकार आपण दिलेल्या शब्दाला जागत नाही. त्यामुळे मोपा विमानतळ व मोपा लिंक रोडसाठी धारगळ ग्रामपंचायतीने जो ना हरकत दाखला दिला आहे, तो मागे घ्यावा, अशी मागणी धारगळ पंचायतीच्या ग्रामसभेत करण्यात आली.
रविवारी धारगळ पंचायत सभागृहात ही ग्रामसभा झाली. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी सरपंच प्रदीप ऊर्फ भूषण नाईक, उपसरपंच अनुराधा नाईक, पंच सदस्य वल्लभ वराडकर, सुनिता राऊळ, सोनाली साळगावकर, प्रदीप पटेकर, अर्जुन कानूळकर, दाजी शिरोडकर, सुभाष धारगळकर उपस्थित होते.
पंचायत सचिव फ्रान्सिस फर्नांडिस यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखवला तसेच ठरावांचे वाचन केले. त्यानंतर 22 -23 सालाचे अंदाजपत्रक सादर करून संमत करण्यात आले. 21-22 सालाच्या सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली.
आयुष हॉस्पिटलमध्ये रोजगाराची मागणी
धारगळ येथे होत असलेल्या आयुष हॉस्पिटलमध्ये यापूर्वी किती स्थानिकांना रोजगार मिळाला आहे व यापुढे स्थानिकांनाच रोजगार मिळावा म्हणून पंचायतीने काय योजना आखल्या आहेत ती माहिती द्यावी असे ग्रामस्थांनी सुचवले. याविषयी सरपंचांनी सांगितले, की आयुष हॉस्पिटलने कार्य सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे. ती देण्यात येईलच; पण त्यांच्याबरोबर करार करून काही मागण्या ठेवण्यात येतील. स्थानिकांना रोजगारासाठी प्राधान्य देण्यात यावे, असेही सांगण्यात येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.