Medical camp Dainik Gomantak
गोवा

Gomantak Medical Camp: गोमन्तक, आरजीच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

रूग्णांना मार्गदर्शन : ईसीजी चाचणीसह रक्तदाब, मधुमेह, दंत व नेत्र चिकित्सा

गोमन्तक डिजिटल टीम

Gomantak Medical Camp: ‘गोमन्‍तक स्‍वास्‍थ्‍यम’ आणि आरजी’ हॉस्‍पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला.

शिबिरात अनेक अंकविक्रेते, एजंट व त्यांचा परिवार तसेच वाचक व हितचिंतकांनी शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराचे उद्‍घाटन वैद्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संपादक-संचालक राजू नायक, मुख्य व्यवस्थापक (व्यवसाय प्रशासन) सचिन पोवार, वरिष्ठ वितरण व्यवस्थापक अरूण पाटील, साहाय्यक व्यवस्थापक वितरण भारत पोवार, आरजी हॉस्पिटलच्या डॉ. रिना तामोस्कर, डॉ. अमित पाटील, डॉ. संगीथ सुधन, आरजीचे समन्वयक विकास सिंग व इतर हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.

शिबिरात रक्तदाब, मधुमेह, इसीजी, डोळे तपासणी, दंत चिकित्सा व इतर आरोग्यविषयक समस्यांबाबत डॉक्टरांनी तपासणी करून सल्ला दिला. या शिबिरास गोमन्तकचे अंकविक्रेते वामन भाटे, अवधूत बिडये, सरिता बिडये, रमेश डिचोलकर, सत्यवती डिचोलकर, के. एस. वेर्णेकर, अविनाश फडते आदी ‘गोमन्तक’चे वाचक, हितचिंतक उपस्थित होते.

जनसेवेचे व्रत घेतलेल्‍या दै. ‘गोमन्‍तक’तर्फे विविध सामाजिक, सांस्‍कृतिक, आरोग्‍यविषयक उपक्रमाचे आयोजित केले जातात. या उपक्रमांना उदंड प्रतिसादही मिळत असतो. ‘गोमन्‍तक’ नेहमीच महिलांसाठीही विविध उपक्रम राबविले जातात.

आरोग्यविषयक शिबिरात व्यवस्था चांगली होती. डॉक्टरांनी सर्वांची तपासणी करून आरोग्यविषयक सल्ले दिले. या स्तुत्य उपक्रमास चांगला प्रतिसाद लाभला.
रमेश डिचोलकर, पणजी
‘गोमन्तक’चे आरोग्य शिबिर उत्तम झाले. डॉक्टरांनी उत्तम तपासणी केली. या आरोग्याविषयक शिबिराचे आयोजन सुव्यवस्थित केल्याबद्दल समाधान वाटले.
के. एस. वेर्णेकर, पणजी
गोमन्तकचा आरोग्यविषयक उपक्रम फारच कौतुकास्पद आहे. त्यांनी आमच्यासाठी व वाचकांसाठी जी आरोग्यविषयक सेवा दिली, त्याबद्दल मी ‘गोमन्तक’ परिवाराचे आभार मानतो. भविष्यातही असेच उपक्रम ‘गोमन्तक’ने राबवावेत.
अवधूत बिडये, पणजी
‘गोमन्तक’च्या आरोग्य शिबिराबाबत मी ‘गोमन्तक’ परिवाराचे आभार मानतो व ‘गोमन्तक’च्या अशा उपक्रमास माझ्या शुभेच्या देतो. आज या शिबिरास उपस्थित राहून आरोग्यासंबंधीची जाणीव झाली.
वामन भाटे, पणजी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

SCROLL FOR NEXT