Goa Monsoon 2023: अस्मानी संकट! खरीप शेती पाण्याखाली, बळीराजाची मेहनत निष्फळ

डिचोलीत कोसळधार; मये, पिळगाव, बोर्डेत मोठे नुकसान
Heavy Rain
Heavy Rain Dainik Gomantaj
Published on
Updated on

Goa Monsoon 2023 सध्याच्या ''कोसळ''धार पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला असून मयेसह पिळगाव आदी डिचोलीतील काही सकल भागातील शेती पाण्याखाली गेली आहे. पावसाच्या तडाख्यात बहुतेक ठिकाणी ''तरवा’ खराब झाल्याने शेतकरी पुरते हवालदिल बनले असून, त्यांची चिंता वाढली आहे.

आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास यंदा खरीप भातशेती बुडाल्यातच जमा आहे. डिचोली विभागीय कृषी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पिळगाव, बोर्डे, मये, शिरगाव, कुडचिरे, साळ, मेणकूरे, धुमासे आदी भागात खरीप भातशेती पीक घेण्यात येते.

यंदा उशिराने म्हणजेच जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस सक्रिय होताच, डिचोलीतील विविध भागात बळीराजा मोठ्या उत्साहाने शेतीत उतरला. मशागतीची कामे उरकून, बळीराजाने लावणीच्या कामाकडे लक्ष केंद्रित केले असतानाच, पावसाचा धुमाकूळ सुरू झाला आहे.

Heavy Rain
CM Pramod Sawant: वास्को-मुरगावमध्ये उच्च माध्यमिक शाळांबाबत आमदारांनी उपस्थित केले प्रश्न; मुख्यमंत्री म्हणाले...

शेतकऱ्यांना आधार द्या

यंदा उशिराने का होईना, शेतकरी मोठ्या उत्साहात शेतीत उतरले होते. तरवा लावणीची कामेही सुरू झाली होती. मात्र पावसाच्या कहरापुढे बळीराजाची मेहनत निष्फळ ठरली आहे. पाच-सहा दिवस शेतीत पाणी भरून राहिल्याने तरव्याची नासाडीच नव्हे, तर अक्षरशः धूप झाली आहे.

अशी व्यथा मये येथील शेतकरी विश्वास चोडणकर आणि चंद्रशेखर शिरोडकर यांनी मांडली आहे. कृषी खात्याने नासाडी झालेल्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना आवश्यक भरपाई मिळवून द्यावी. या नैसर्गिक आपत्ती ओळखून सरकारनेही शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी मयेतील शेतकऱ्यांनी केली आहे.

Heavy Rain
Natural Disaster: ...अन्यथा आता विनाश अटळ आहे!

तरवा खराब

मुळाक खाजन शेतीत जवळपास तीनशे शेतकरी पिके घेतात. यंदाही शेतकरी मोठ्या उत्साहात शेतीत उतरले आहेत. मात्र गेल्या आठवड्यापासून सतत पडणाऱ्या कोसळधार पावसामुळे ही शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या तरवा खराब झाला.

काही शेतकऱ्यांनी लावणी केली होती. मात्र शेती पाण्याखाली गेल्याने रोपे कुजून लावणी केलेल्या शेतीची नासाडी झाली आहे. आधीच यंदा शेतीची कामे उशिराने हाती घेण्यात आली होती. त्यातच आता पावसाचा कहर वाढल्याने शेतकऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com