Bhandari Community Dainik Gomantak
गोवा

Bhandari Community In Goa: धक्कादायक बाब! गोमंतक भंडारी संघटनेतील नियम बदल अन्यायकारक; समाज माध्यमांवर तीव्र पडसाद

Gomantak Bhandari Samaj: गोमंतक भंडारी समाजाने समाज संघटनेची घटना दुरुस्ती करताना देशाच्या राज्यघटनेचा अवमान केला आहे. जिल्हा संस्था नोंदणी अधिकाऱ्यांसमोर या घटना दुरुस्तीला आव्हान देण्यात आले आहे. या सुनावणीदरम्यान समाजाने राज्य घटनेतील तरतुदीला हरताळ फासणारा निर्णय घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Gomantak Bhandari Samaj Faces Backlash for Alleged Constitutional Breach

पणजी: गोमंतक भंडारी समाजाने समाज संघटनेची घटना दुरुस्ती करताना देशाच्या राज्यघटनेचा अवमान केला आहे. जिल्हा संस्था नोंदणी अधिकाऱ्यांसमोर या घटना दुरुस्तीला आव्हान देण्यात आले आहे. या सुनावणीदरम्यान समाजाने राज्य घटनेतील तरतुदीला हरताळ फासणारा निर्णय घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याचिकादारांचे वकील अनिश बकाल यांनीही या गोष्टीची पुष्टी केली आहे.

समाजाच्या तीन वार्षिक आमसभांना उपस्थित राहणाऱ्या व्यक्तीच निवडणुकीत उमेदवार असू शकतात असाही नियम केला आहे. हा नियम अनेक सदस्यांसाठी अन्यायकारक आहे. अनेक कारणांमुळे काही सदस्यांना आमसभांना उपस्थित राहता येत नाही; परंतु त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान कधीही कमी मानता येणार नाही. या नियमामुळे अनेक पात्र उमेदवारांना निवडणुकीपासून दूर ठेवले जाईल, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.

संघटनेच्या घटनेत आणखी एक बदल केला आहे, तो म्हणजे फक्त ५० वर्षांवरील व्यक्तीच समाजाच्या निवडणुकीत उमेदवारी करू शकते. हा नियम अत्यंत वादग्रस्त आहे. कारण तो समाजातील तरुण आणि प्रेरित व्यक्तींना समाजसेवेपासून दूर ठेवतो. तरुणांनी समाजाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा असते; परंतु हा बदल समाजातील अनेकांना त्यांच्या सामाजिक योगदानाच्या संधीपासून वंचित ठेवतो, अशी भावना तयार होऊ लागली आहे. जिल्हा निबंधक याप्रश्नी न्याय देतील, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

...म्हणून घटना दुरुस्ती वादात

देशाच्या राज्यघटनेत अनुच्छेद १४ आणि २१ अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे विवाह करण्याचा अधिकार आहे.

असा विवाह केल्याने त्या व्यक्तीचे सामाजिक स्थान किंवा तिच्या मूलभूत अधिकारांवर परिणाम होऊ शकत नाही.

असे असतानाही केंद्रीय समितीने भंडारी बंधू-भगिनीने दुसऱ्या जाती किंवा धर्माच्या व्यक्तीशी विवाह केला तर त्यांना केंद्रीय, महिला, युवा किंवा तालुका समित्यांवर स्थान मिळणार नाही, अशी घटना दुरुस्ती केली आहे.

ती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

या घटना दुरुस्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी अपूर्ण राहिली असून सोमवारी ती पुन्हा सुरू होणार आहे.

ही खेळी कोणाला डावलण्यासाठी?

राज्यघटनेनुसार भारतीयांना कुठल्याही जाती-धर्मातील व्यक्तीशी विवाह करण्याचा अधिकार आहे. असा विवाह केल्याने त्याची जात बदलत नाही; पण अशोक नाईक यांनी हा बदल करून समाज बांधवांवर अन्याय केला आहे, अशी भावना तयार झाली असून त्याविषयी समाज माध्यमांद्वारे विचार मंथन सुरू झाले आहे. निवडणुकीत कोणाला डावलण्यासाठी ही खेळी खेळली आहे, याचीही चर्चा सुरू झाली आहे.

नियम बदल घटनाबाह्य

समाज संघटनेच्या विद्यमान समितीने हा बदल करून भारतीय राज्यघटनेचा अवमान केला आहे. विवाह हे प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिगत स्वातंत्र्य असते. असा नियम बनवून समाजातील अनेक बंधू-भगिनींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले जात आहे. हा बदल घटनाबाह्य असून, समाज बांधवांवर मोठा अन्याय आहे, अशी भावना निर्माण झाली आहे. व्हॉटसॲपच्या माध्यमातून समाज बांधवांची याविषयीची मते जाणून घेणे अशोक यांच्या विरोधी गटाने सुरू केले आहे.

भारतीय राज्यघटनेचेही अवमूल्यन

सत्ताधारी अशोक नाईक गटाने भंडारी समाजाच्या घटनेत केलेले बदल फारच चर्चेत आले आहेत. या नियमानुसार भंडारी बंधू-भगिनींनी दुसऱ्या जाती किंवा धर्माच्या व्यक्तीशी विवाह केला तर त्याला केंद्रीय, युवा, महिला समिती किंवा तालुका समितीवर राहण्याचा अधिकार नसेल. हा केलेला बदल भारतीय घटनेविरुद्ध आहे. असा बदल करून अशोक नाईक यांनी भारतीय राज्यघटनेचा अवमान केला आहे, अशी टीकाही समाज माध्यमांवर करण्यात आली आहे.

बंधू-भगिनींवर अन्याय

ॲड. अनिश बकाल यांनी सांगितले की, अशोक नाईक गटाने भंडारी समाजाच्या घटनेत केलेले बदल हे राज्य घटनाबाह्य आणि अन्यायकारक आहेत. समाजाच्या घटनेचा आदर न करता अशाप्रकारचे बदल करून समाजातील अनेक बंधू-भगिनींवर अन्याय केला जात आहे. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला स्वतंत्रता, समता आणि न्यायाची हमी दिली आहे.

अशाप्रकारचे बदल समाजाच्या हिताच्या विरोधात आहेत. समाजाच्या लोकशाही प्रक्रियेचा आदर राखला जावा आणि या बदलांवर योग्य ती कारवाई केली जावी, अशी समाजातील अनेक जीवन सदस्यांची मागणी आहे. अशा घटनाबाह्य बदलांना विरोध करणे, हा समाजातील एकतेच्या आणि न्यायाच्या तत्त्वांचा सन्मान राखण्याचा मार्ग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT